विश्वकप जोडा जाड
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
३० वर्षीय स्टुअर्ट बिन्नीला विशेष अनुभव नसला तरी त्याला विश्वकप संघात स्थान मिळाले. नऊ सामने खेळणाऱ्या बिन्नीने एकूण ९१ धावा केल्या असून त्यात त्याची सर्वोत्तम खेळी ४४ धावांची आहे. या व्यतिरिक्त त्याने १३ बळी घेतले आहेत. विश्वकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील माजी क्रिकेटपटू व १९८३ च्या विश्वकप विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या रॉजर बिन्नीचा पुत्र असलेल्या स्टुअर्टवर उपयुक्तता सिद्ध करण्याचे दडपण राहणार आहे.
विश्वकप जोडा जाड
३० वर्षीय स्टुअर्ट बिन्नीला विशेष अनुभव नसला तरी त्याला विश्वकप संघात स्थान मिळाले. नऊ सामने खेळणाऱ्या बिन्नीने एकूण ९१ धावा केल्या असून त्यात त्याची सर्वोत्तम खेळी ४४ धावांची आहे. या व्यतिरिक्त त्याने १३ बळी घेतले आहेत. विश्वकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील माजी क्रिकेटपटू व १९८३ च्या विश्वकप विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या रॉजर बिन्नीचा पुत्र असलेल्या स्टुअर्टवर उपयुक्तता सिद्ध करण्याचे दडपण राहणार आहे. अष्टपैलू सुरेश रैनाला कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य राखता आले नसले तरी वन-डेमध्ये मात्र त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. २०७ वन-डे खेळणाऱ्या रैनाने ५१०४ धावा फटकाविल्या आहे. २८ वर्षीय रैना धोनीचा आवडता खेळाडू आहे. रैनाचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार आहे. विश्वकप स्पर्धेच्या कामगिरीवर नजर टाकली असता १९७५ व १९७९ मध्ये भारताला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता, पण १९८३ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकाविले होते. १९८७ मध्ये भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले तर १९९२ मध्ये भारताला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. २००३ मध्ये भारत उपविजेता होता. २०११ मध्ये भारताने पुन्हा एकदा जेतेपदाला गवसणी घातली. २०१५ मध्ये भारतापुढे जेतेपद राखण्याचे आव्हान आहे. (वृत्तसंस्था)