शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

युवा संघात विजेतेपद पटकावण्याची क्षमता

By admin | Updated: November 7, 2015 03:15 IST

भारताचा ज्युनियर संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच मलेशियात झालेल्या स्पर्धेत भारताच्या युवकांनी दर्जेदार संघांचा समावेश असतानाही उपविजेतेपद पटकावले.

- रोहित नाईक,  मुंबईभारताचा ज्युनियर संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच मलेशियात झालेल्या स्पर्धेत भारताच्या युवकांनी दर्जेदार संघांचा समावेश असतानाही उपविजेतेपद पटकावले. त्यामुळेच आगामी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघात विजेतेपद पटकावण्याची क्षमता आहे, असे भारताचा माजी हॉकीपटू वीरेन रस्किना याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मलेशिया येथे १४ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या आठव्या ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा युवा संघ सज्ज असून, त्यानिमित्ताने वीरेनने आपले मत मांडले. याआधी मलेशिया येथेच झालेल्या सुलतान जोहोर स्पर्धेतही युवा भारतीय संघाने चमकदार कामगिरीसह उपविजेतेपद पटकावले होते. या कामगिरीचा त्यांना फायदा होईल. प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांची मेहनत यात दिसून येत आहे. तसेच, ज्युनियर संघात अनेक गुणवान खेळाडू असून त्यांच्यात पुढील काही वर्षांत वरिष्ठ संघातून खेळण्याची क्षमता आहे, असेही वीरेनने सांगितले.२००४च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये भारतीय संघातून खेळलेला वीरेन वरिष्ठ हॉकी संघाविषयी म्हणाला, की आज भारतीय हॉकी योग्य प्रकारे आपली वाटचाल करीत आहे. नुकताच न्यूझीलंड येथे झालेल्या मालिकेत भारताने चमकदार खेळ केला. रोलंट ओल्टमन्स यांच्या रूपाने जबरदस्त प्रशिक्षक मिळाला असून, माझ्या मते ते सर्वोत्कृष्ट आहेत. आॅलिम्पिकच्या दृष्टीने म्हणाल, तर आपल्याला सर्वप्रथम टॉप ६मध्ये येण्याचा प्रयत्न करावा लागेल.२७ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या विश्व हॉकी लीग स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा अनुभवी सरदारसिंगवर सोपविण्यात आली आहे. याविषयी वीरेनने सांगितले, की सरदार अप्रतिम खेळाडू असून एक चांगला कर्णधार आहे. तो आपल्या नेतृत्वामध्ये आणखी प्रगती करू शकतो. मैदानावर प्रत्येक वेळी तो पुढाकार घेतो; परंतु कर्णधार म्हणून त्याने संघाचा आत्मविश्वास वाढवावा. त्याचप्रमाणे संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नसून, प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव असून, त्यानुसार प्रत्येक जण चमक दाखवेल, असा विश्वासही वीरेनने या वेळी व्यक्त केला.माझ्या मते, आॅलिम्पिकच्या दृष्टीने थेट पदकाची अपेक्षा करण्यापेक्षा आपण छोटे-छोटे लक्ष्य ठेवले पाहिजे. याआधी लंडन आॅलिम्पिकमध्ये आपण १२व्या स्थानी राहिलो होतो. तर, आता आपण अव्वल ६मध्ये येण्याचे लक्ष्य बाळगले पाहिजे. अशा टार्गेटमुळे आपल्याला मुख्य लक्ष्य गाठण्यात यश मिळेल.- वीरेन रस्किना