शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित सावंतची आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 02:05 IST

कुरवली (ता. इंदापूर) येथील अभिजित तात्यासो सावंत (वय १५) याची मॉरिशस येथे दि. २४ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशिप्ससाठी निवड झाली आहे.

लासुर्णे : कुरवली (ता. इंदापूर) येथील अभिजित तात्यासो सावंत (वय १५) याची मॉरिशस येथे दि. २४ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशिप्ससाठी निवड झाली आहे.सन २०१४ ते २०१८ पर्यंत बेंगलोर, गोंदिया, छत्तीसगढ, पॉण्डेचरी, मॉरिशस, दुबई इ. स्तरावर योगा स्पर्धेत सहभागी होत तालुका, जिल्हास्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करीत अनेक सुवर्णपदके मिळविली आहेत. सावंत सध्या अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सैनिक शाळेत नुकताच इ. ९वीमध्ये उत्तीर्ण झाला आहे.चालू शैक्षणिक वर्षांत १० वीमध्ये शिक्षण घेत योगाचा सराव सुरु ठेवणार असल्याचे सावंतनेसांगितले. बालपणापासून आवड असलेल्या योगासनामुळे आतापर्यंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलेआहे.या निवडीबद्दल साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अभिजित सावंत यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव माने, माजी उपसरपंच अंबादास कवळे, पैलवान नितीन माने व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.विविध ठिकाणच्या योगा स्पर्धेसाठी विद्यालयाचे संस्थापक अण्णासाहेब डांगे, सचिव चिमणभाऊ डांगे, व्यवस्थापक सुनील शिनगारे, प्राचार्य सुभाष पाटील, मुख्याध्यापक महेश जाधव, क्रीडा मार्गदर्शक परेश पाटील, योगा शिक्षक सुशांत घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले.