शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

एबीला अमला भारी! पंजाबचा सलग दुसरा विजय

By admin | Updated: April 10, 2017 23:00 IST

रॉयल चॅलेजर्स मात करत किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली

ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. 10 - रॉयल चॅलेजर्स  मात करत  किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हाशिम अमला, ग्लेन मॅक्सवेल आणि मनन व्होरा यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाबने 8 गडी राखून विजय मिळवला. 
149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मनन व्होरा (34) आणि हाशिम अमलाने पंजाबला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनीही 6 षटकात 62 धावा कुटत पंजाबच्या विजयाची पायाभरणी केली.  त्यानंतर व्होरा (34) आणि अक्षर पटेल (9) झटपट बाद झाले. पण हाशिम अमला (नाबाद 58 ) आणि ग्लेन मॅक्सवेल (नाबाद 43) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य 72 धावांची भागीदारी करत पंजाबला 15व्या षटकातच विजय मिळवून दिला.  
   तत्पूर्वी आयपीएलमध्ये प्रेक्षकांना आज पुन्हा एकदा एबी डीव्हिलियर्सच्या तुफान फटकेबाजीचा नजराणा पाहता आला. आघाडीच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यानंतर एबी डीव्हिलियर्सने केलेल्या घणाघाताच्या जोरावर बंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी 149 धावांचे आव्हान ठेवले होते. एबीने अवघ्या 46 चेंडूत तीन चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावा कुटल्या. 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर बंगळुरुची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार शेन वॉटसन (1) पहिल्याच षटकात माघारी परतला. विष्णू विनोद (7) आणि केदार जाधव (1) हेही झटपट बाद झाले. तीन फलंदाज बाद झाल्यावर एबी डीव्हिलियर्स आणि मनदीप सिंग (28) यांनी सावध फलंदाजी करत संघाला सावरले. पण या दोघांनाही वेगाने धावा जमवता अल्या नाहीत. त्यातच मनदीप सिंग मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने बंगळुरूच्या अडचणी अधिकच वाढल्या. पण  एबी आणि स्टुअर्ट बिन्नीने अखेरच्या 4 षटकांत 68 धावा कुटत बंगळुरूला 148 धावांपर्यंत मजल मारून दिली.