शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

एबी सैराट, तर आरसीबी झिंगाट

By admin | Updated: May 25, 2016 03:10 IST

सामना हातातून जवळजवळ निसटलेला असताना धडाकेबाज एबी डिव्हिलीयर्स व इक्बाल अब्दुल्ला यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने निर्णायक पहिल्या क्वालिफायर

बंगळुरू : सामना हातातून जवळजवळ निसटलेला असताना धडाकेबाज एबी डिव्हिलीयर्स व इक्बाल अब्दुल्ला यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने निर्णायक पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात लायन्सला ४ विकेटनी नमवून आयपीएलच्या नवव्या मोसमाची अंतिम फेरी गाठली. ६ बाद ६८ अशी केविलवाणी अवस्था असताना एबीने ४७ चेंडंूत नाबाद ७९ धावांचा तडाखा दिला. तर, अब्दुल्लाने २५ चेंडूंत नाबाद ३३ धावांची फटकेबाजी केली. या दोघांच्या धडाक्यापुढे धवल कुलकर्णीचा (४/१४) भेदक मारा झाकोळला गेला.एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बँगलोरने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना गुजरातला २० षटकांत १५८ धावांवर रोखले. एकूणच स्पर्धेतील बँगलोरच्या फलंदाजांनी लावलेला धडाका पाहता, त्यांचा दणदणीत विजय गृहीत धरला जात होता. मात्र, कर्णधार विराट कोहली (०), विध्वंसक ख्रिस गेल (९), लोकेश राहुल (०), शेन वॉटसन (१) व सचिन बेबी (०) झटपट परतल्याने बँगलोरचा डाव सहाव्या षटकात ५ बाद २९ असा घसरला.या वेळी एका बाजूने टिकलेल्या एबीने स्टुअर्ट बिन्नीसह ३९ धावांची भागीदारी केली. बिन्नी (२१) बाद झाल्यानंतर बँगलोरवर पुन्हा दडपण आले; परंतु त्यानंतर आलेल्या अब्दुल्लाने अखेरपर्यंत एबीला साथ देऊन संघाला थरारक विजय मिळवून दिला. या दोघांनी ९१ धावांची नाबाद भागीदारी करून गुजरातला नमवले. एबीने ४७ चेंडंूत प्रत्येकी ५ चौकार व षटकार ठोकले. तर, अब्दुल्लाने २५ चेंडंूत ३ चौकार व एक षटकार मारला. धवलने १४ धावांत ४ प्रमुख फलंदाज बाद करून बँगलोरच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते. मात्र, एबी-अब्दुल्ला यांनी गुजरातच्या हातातील सामना हिसकावून घेतला. बँगलोरने १८.२ षटकांत ६ बाद १५९ धावा करून अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. तत्पूर्वी, ३ बाद ९ धावा अशी अवस्था झालेल्या गुजरातला ड्वेन स्मिथने तडाखेबंद अर्धशतक झळाकवून समाधानकारक मजल मारून दिली. स्मिथने ४१ चेंडंूत ५ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी करून ७३ धावा फटकावल्या. दिनेश कार्तिकने ३० चेंडंूत २६ धावा काढून त्याला चांगली साथ दिली. वॉटसनने (४/२९) अचूक मारा केला. तर, अब्दुल्लाने सुरुवातीला अ‍ॅरोन फिंच व ब्रँडन मॅक्युलम यांना बाद करून गुजरातची फलंदाजी उद्ध्वस्त केली होती. संक्षिप्त धावफलक : गुजरात लायन्स : २० षटकांत सर्व बाद १५८ धावा (ड्वेन स्मिथ ७३, दिनेश कार्तिक २६; शेन वॉटसन ४/२९, इक्बाल अब्दुल्ला २/३८) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : १८.२ षटकांत ६ बाद १५९ धावा (एबी डिव्हिलीयर्स नाबाद ७९, इक्बाल अब्दुल्ला नाबाद ३३; धवल कुलकर्णी ४/१४, रवींद्र जडेजा २/२१).