अ.भा. फिडे मानांकन स्पर्धा
By admin | Updated: June 20, 2014 22:28 IST
रायसोनी स्मृती अ.भा. फिडे
अ.भा. फिडे मानांकन स्पर्धा
रायसोनी स्मृती अ.भा. फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा आजपासून नागपूर: जी. एच. रायसोनी स्मृती फिडे मानांकन अ.भा. बुद्धिबळ स्पधेर्ेला उद्या शनिवारपासून दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज ॲन्ड रिसर्च सभागृहात सुरुवात होत आहे. नागपूर तालुका चेस असोसिएशन तसेच पॅरेंटस् चेस असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे.स्पर्धेत देशभरातील ३०० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. जे प्रमुख खेळाडू सहभागी होणार आहेत त्यात आंतरराष्ट्रीय मास्टर हिमांशु शर्मा व अनुप देशमुख, फिडे मास्टर सौरभ खेर्डेकर,आकाश ठाकूर, गुरुप्रितसिंग मरास, दिलीप पागे यांचा प्रामुख्याने समावेश असेल. विजेत्या खेळाडूंवर दीड लाख रुपयांच्या पुरस्कार रकमेचा वर्षाव करण्यात येणार आहे. याशिवाय काही वैयक्तिक पुरस्कार देखील आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी ९.३० वाजता आ. सुधाकर देशमुख हे करतील. विशेष अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये, रायसोनी समूहाचे उपाध्यक्ष हेमंत सोनारे, डॉ. आंबेडकर इन्स्टट्यिूटचे संचालक सुधीर फुलझेले आदींची उपस्थिती राहील. (क्रीडा प्रतिनिधी)