शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीजिंगमध्ये रंगणार २०२२ आॅलिम्पिक

By admin | Updated: August 1, 2015 00:38 IST

आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) बीजिंग (चीन) शहराला २०२२ सालच्या हिवाळी आॅलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद बहाल केले आहे. विशेष म्हणजे २००८ साली उन्हाळी आॅलिम्पिक स्पर्धेचे

क्वाललांपूर : आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) बीजिंग (चीन) शहराला २०२२ सालच्या हिवाळी आॅलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद बहाल केले आहे. विशेष म्हणजे २००८ साली उन्हाळी आॅलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषविलेले बीजिंग शहर उन्हाळी व हिवाळी अशा दोन्ही ओलिम्पिकचे यजमानपद भूषविणारे पहिले शहर ठरले आहे.२०२२ सालच्या हिवाळी आॅलिम्पिकचे यजमानपद पटकावण्याच्या शर्यतीमध्ये बीजिंग समोर काजाकिस्तानच्या अलमाटी शहराचे मोठे आव्हान होते. परंतु, बिजींगने ८५ आयओसी देशांच्या मतांच्या जोरावर बाजी मारली. दरम्यान यावेळी दोन वेळा मतदान झाले. इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर पुन्हा एकदा आयओसी संलंग्न असलेल्या देशांच्या प्रतिनिधींनी कागदावर मतदान केले. यावेळी बिजींगने अलमाटी शहराचा ४४-४० अशा मताधिक्यांनी पराभव केला. दरम्यान एका सदस्य देशाने या मतदानामध्ये सहभाग घेतला नाही.बिजींगमध्ये नैसर्गिक बर्फाची कमतरता असूनही या शहराला २०२२ सालच्या हिवाळी ओलिम्पिकचे यजमानपद देण्यात आले. यास कारण म्हणजे, २००८ साली बिजींगने उन्हाळी आॅलिम्पिकचे यशस्वी आयोजन केले होते. यानुसारच चीनी प्रतिनिधी मंडळाने देखील आयोसीला हिवाळी आॅलिम्पिकच्या यशस्वी आयोजनाचा विश्वास दिला.दरम्यान, या निर्णयानंतर पुर्व आशियाला सलग तिसऱ्यांदा आॅलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. दक्षिण कोरीयाच्या प्योंगचांग शहरामध्ये २०१८ सालचे हिवाळी आॅलिम्पिक आयोजित होणार असून टोकियो शहर २०२० सालचे उन्हाळी आॅलिम्पिकचे यजमानपद भूषविणार आहे. या दोन स्पर्धांनंतर चीनच्या बिजींग शहरामध्ये हिवाळी ओलिम्पिकचा क्रीडा कुंभमेळा रंगेल. (वृत्तसंस्था)