शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

२०-टष्ट्वेन्टीला हवेत अष्टपैलू खेळाडू...

By admin | Updated: April 4, 2015 04:06 IST

चौकार... षटकारांची आतषबाजी... धावांची होणारी बरसात..धुव्वाधार शतक...अर्धशतक..अशी वेगवान टी-टष्ट्वेन्टीची पर्वणी इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) माध्यमातून

विशाल शिर्के , पुणे चौकार... षटकारांची आतषबाजी... धावांची होणारी बरसात..धुव्वाधार शतक...अर्धशतक..अशी वेगवान टी-टष्ट्वेन्टीची पर्वणी इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट देखील वेगवान झाले असल्याचे यंदाच्या विश्वचषकात पाहायला मिळाले. आयपीएलची ही खासियत टिकवून ठेवण्यासाठी संघ व्यवस्थापक देखील आता अधिक गुणवान क्रिकेट टॅलेंट शोधण्यासाठी पुढे येत आहेत. त्यासाठी अष्टपैलु खेळाडू घडविण्यावर अधिक भर दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे लेव्हल थ्री प्रशिक्षक राकेश शर्मा यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला...आपले कौशल्य दाखविण्यासाठी स्थानिक क्रिकेटपटूंना आयपीएलच्या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जगभरातील उत्कृष्ट क्रिकेटपटूंना या स्पर्धेने एका छताखाली आणले आहे. इतकेच काय तर स्थानिक क्रिकेटपटूंना महेंद्रसिंग धोणी, सचिन तेंडूलकर, राहुल द्रवीड, ख्रिस गेल, रिकी पॉंटींग, विरेंद्र सेहवाग, यांसारख्या आजी-माजी खेळाडूंसमवेत ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या खेळाडूंचे अनुभव विश्वदेखील समृद्ध होण्यास मदत होत आहे. तसेच ज्या खेळाडूंना केवळ पडद्यावरच खेळताना पाहिले आहे, त्यांच्या बरोबर बसण्याची मिळालेली संधी देखील खेळाडूचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत करते. शर्मा म्हणाले, टी-टष्ट्वेन्टी मुळे क्रिकेट फलंदाजांचा खेळ झाला आहे. त्यामुळे सहाजिकच प्रत्येक संघाचा कल हा अष्टपैलु खेळाडू घडविण्याकडे असतो. कारण सातव्या-आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येवून वीस-पंचवीस धावा जमविल्यास संघाला ते फायदेशीर ठरु शकते. याचा अर्थ केवळ गोलंजाद हवा नसतो असे नाही. प्रत्येक सामन्यात सरासरी दोन बळी घेण्याची क्षमता असलेला गोलंदाज, अथवा जॉन्टी ऱ्होड्स सारखा अफलातून क्षेत्ररक्षक असेल तरीही प्रतिस्पर्ध्यावर दडपण येतेच. त्यामुळे असा खेळाडू संघाना हवाच असतो. तसेच खेळाडू संघ अडचणीत असताना कशी कामगिरी करतो, दडपणात तो कसा खेळ कररु शकतो, केवळ फटकेबाजीचा विचार करतो की, फटका मारण्यास योग्य असलेल्या चेंडूची खेळाडू वाट पाहतो, याचाही विचार त्याची खेळाची पद्धत ठरविण्यास उपयोगी ठरते. एखादा खेळाडू जर सलग ३० ते ४० धावा काढून बाद होत असेल, तर तो लवकर आपला संयम घालवून बाद होतो की काय याचाही विचार केला जातो. त्या नुसार खेळाडूच्या कमकुवत बाजूवर काम केले जाते, असे शर्मा म्हणाले.