शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली

By admin | Updated: July 14, 2017 20:35 IST

क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य सौरव गांगुलीने झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार झाला असल्याचे स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १४ - भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीर खानची निवड झाल्यानंतर त्याच्या उपलब्धतेवरून वाद निर्माण झाला होता. अखेर क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य सौरव गांगुलीने झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार झाला असल्याचे स्पष्ट केले आहे.  भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीची निवड करताना क्रिकेट सल्लागार समितीने झहीर खान आणि राहुल द्रविड यांना अनुक्रमे गोलंदाजी आणि फलंदाजीचे सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. 
झहीर खानसोबत वर्षासाठी १५० दिवसांचा करार झाला आहे, असे  सौरव गांगुलीने आज इडन गार्डनवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना सांगितले. तर बीसीसीआयनेही राहुल द्रविड आणि झहीर खानची निवड ही महत्त्वाच्या दौऱ्यांसाठीच झाली  असल्याचे स्पष्ट केले होते.झहीर खान १०० दिवसांहून अधिक वेळ भारतीय संघासाठी देण्यास इच्छुक नव्हता. पण क्रिकेट सल्लागार समितीने त्याला ५० दिवस वाढवून १५० दिवसांचा करार करण्यास राजी केले.अधिक वाचा (सचिन, सौरव आणि लक्ष्मण कोच निवडीच्या लायकीचे नाहीत - संदीप पाटील )
 
(मला आव्हान स्वीकारण्याची सवय - रवी शास्त्री)
 झहीर आणि  राहुल द्रविड यांची नियुक्ती झाल्यानंतर रवी शास्त्रीच्या अधिकारांमध्ये मर्यादा आणण्यासाठी या दोघांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू झाली होती. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड झाल्यानंतर आता सर्वकाही ठीक होईल असे वाटत असतानाच   सपोर्ट स्टाफच्या निवडीवरुन पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. काल बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीरची करण्यात आलेली नियुक्ती फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडप्रमाणे दौरा विशेष असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत. झहीर खान गोलंदाजी सल्लागार असतानादेखील शास्त्रींनी निकटवर्तीय भरत अरुण यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. सचिन, सौरव आणि लक्ष्मण या त्रिमूर्तीने  निवडलेल्या सपोर्ट स्टाफवर प्रशासनिक समितीने (COA) प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यामधून आपले हात काढत त्यांची निवड ही परदेश दौऱ्यासाठी असेल असे स्पष्ट केले.