शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कसोटीची १४० वर्षे

By admin | Updated: March 16, 2017 01:20 IST

कसोटी क्रिकेटला आज १४० वर्षे पूर्ण झाली. क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना १५ मार्च १८७७ रोजी आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळविण्यात आला होता.

कसोटी क्रिकेटला आज १४० वर्षे पूर्ण झाली. क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना १५ मार्च १८७७ रोजी आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळविण्यात आला होता. आॅस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) झालेल्या या सामन्यात इंग्लंडला ४५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर इग्लंडने पुढील सामना जिंकत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली होती.भारताने १९३२ पासून कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. भारताने आतापर्यंत ५१० कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील १३८ सामन्यांत विजय तर १५८ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. २१३ सामने अनिर्णित राहिले होते. एक सामना ‘टाय’ होता. सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम इग्लंडच्या नावावर आहे. इग्लंडने ९८९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ३५१ सामने जिंकले असून २८९ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. इग्लंडने ३४३ सामने अनिर्णित सोडवले. आॅस्ट्रेलियाने ७९९ कसोटी सामने खेळले असून त्यांनी ३७७ सामने जिंकले आहेत. आॅस्ट्रेलियाने केवळ २१४ सामने गमावले आहेत. बांगलादेश हा सर्वात कमी कसोटी सामने खेळणारा संघ आहे. त्यांनी ९९ कसोटी सामने खेळले असून त्यात केवळ ८ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांनी ७६ सामने गमावले आहेत. बांगलादेशने १५ सामन्यांत बरोबरी साधली आहे. जगात एकूण १० संघ कसोटी सामने खेळत आहेत. ज्यामध्ये आॅस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. संकलन-सचिन कोरडे