वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी १४ सदस्यीय संघ जाहीर
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी १४ सदस्यीय वेटलिफ्टिंग संघ जाहीर
वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपसाठी १४ सदस्यीय संघ जाहीर
वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी १४ सदस्यीय वेटलिफ्टिंग संघ जाहीरनवी दिल्ली : ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता शिवालिंगम सतीश कुमार आणि खुमुकचाम संजीता चानू यांच्यावर अमेरिकेतील ूस्टन येथे होणार्या आयडब्ल्यूएफ सिनिअर जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे आव्हान अवलंबून असणार आहे.भारताचा १४ सदस्यीय संघ १० ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणार्या या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याप्रमाणेच ऑलिम्पिकमधील आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करील. सात पुरुष आणि सात महिला वेटलिफ्टर यांच्याशिवाय भारतीय पथकात चार प्रशिक्षक, एक मलेशिया आणि एक फिजिओथेरेपिस्टचा समावेश असेल.विश्वचॅम्पियनशिपआधी पूर्ण संघ प्रतिष्ठित स्पर्धेच्या तयारीसाठी परदेशातील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होईल. संघ पुढीलप्रमाणे : पुरुष : सुखेन डे (५६ किलो), जमजांग देरू (५६ किलो), अपूर्व चेतिया (६२ किलो), दीपक लाठेर (६२ किलो), पापुल चांगमाई (६९ किलो), शिवलिंगम सतीश कुमार (७७ किलो) आणि कोजुम ताबा (७७ किलो). महिला : खुमुकचाम संजीता चानू (४८ किलो), साइखोम मीराबाई चानू (४८ किलो), मात्सा संतोषी (५३ किलो), बंगारू उषा (५३ किलो), प्रमिला क्रुसानी (५८ किलो), मिनाती सेठी (५८ किलो), आणि पूनम यादव (६३ किलो). प्रशिक्षक : विजय शर्मा, कंु जराणी देवी, संदीप कुमार आणि बलविंदर सिंह मेहदवान. फिजिओथेरपिस्ट: आक्रांत सक्सेना. (वृत्तसंस्था)