शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

101 वर्षाच्या भारतीय महिलेने धावण्याच्या शर्यतीत जिंकले सुवर्णपदक

By admin | Updated: April 24, 2017 14:32 IST

एखादे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर, वयाचा मुद्दा कधीही आड येत नाही.

 ऑनलाइन लोकमत 

ऑकलंड, दि. 24 - एखादे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर, वयाचा मुद्दा कधीही आड येत नाही. 101 वर्षाच्या मन कौर यांनी इतरांसाठी अशीच प्रेरणादायी कामगिरी केली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड येथे सुरु असलेल्या वर्ल्ड मास्टर्स गेम्समध्ये सोमवारी मन कौर यांनी 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. कौर यांनी 1 मिनिट 14 सेकंदात हे अंतर पार केले.
 
कौर यांच्या सुवर्णपदकाचे वैशिष्टय म्हणजे वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी ही कामगिरी करुन दाखवली. वयाच्या शंभरीपर्यंत पोहोचलेल्या किंवा शंभरी पार करणा-या व्यक्ती अपवादात्मक असतात. वयाची सत्तरी पार केल्यानंतरच अनेकजण थकून जातात. त्यांना चालणेही जमत नाही. अशा वयात धावण्याच्या शर्यतीत मनकौर यांनी सुवर्णपदक मिळवले. 
 
100 वर्ष वयोगटात कौर एकटया स्पर्धक होत्या. त्यामुळे त्यांचा विजय निश्चितच होता. पण या वयात धावणे ही साधी गोष्ट नाही. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 25 हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. मी स्पर्धेत सहभागी होऊन धावण्याचा आनंद घेतला. मी धावणे थांबवणार नाही. यापुढच्या स्पर्धांमध्ये मी सहभागी होईन. आठ वर्षांपूर्वी 93 वर्षाच्या असताना मुलाच्या सल्ल्याने त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये  धावायला सुरुवात केली.