नवी दिल्ली : आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी वन-डे वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी सामना खेळविण्यात येणार आहे़ हा सामना जवळपास १ अब्जाहून अधिक लोक बघण्याची शक्यता आहे़ वर्ल्ड कपमधील हा आतापर्यंतचा एक विक्रम असेल़द आॅस्ट्रेलियन या वृत्तपत्राने वृत्तसंस्थेला सांगितले की, ३० मार्च २०११ रोजी मोहाली येथे झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमधील भारत-पाकमधील उपांत्य सामना ९८ कोटी ८० लाख लोकांनी बघितला होता़ आता आगामी वर्ल्ड कपमध्ये हा विक्रम मोडीत निघेल, अशी शक्यता आहे़ विशेष म्हणजे वन-डे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही़ आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले आहेत़ त्यात प्रत्येक वेळी भारताने बाजी मारली आहे़ भारत आणि पाक यांच्यात होणाऱ्या या सामन्याची तिकिटे सहा महिन्यांपूर्वीच विकली गेली आहेत़
१ अब्ज लोक बघणार भारत-पाक सामना
By admin | Updated: January 14, 2015 02:34 IST