शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे अनुकरण करावे, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचे आवाहन

By कमलाकर कांबळे | Updated: August 20, 2023 17:49 IST

अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने युवा वर्गाने प्रयत्न करावेत,असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले. 

नवी मुंबई:  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे मानवतावादी आणि क्रांतिकारी विचारांचे आजच्या युवा वर्गाने अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मत भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी व्यक्त केले आहे. अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने युवा वर्गाने प्रयत्न करावेत,असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले. 

महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटक मातंग समाज महासंघ आणि उमाकांत नामवाड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  संदीप नाईक उपस्थित होते.  अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले. कष्टकरी,श्रमिक, वंचितांना जगण्याचे बळ दिल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. नवी मुंबईच्या सामाजिक विकासात मातंग समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक हे मातंग समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कायम आग्रही राहिलेले आहेत. या समाजाच्या नेतृत्वाला नाईक यांनी नेहमीच सन्मानाचे स्थान दिले आहे. यापुढे सुद्धा मातंग समाजाचे प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे संदीप नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. मातंग समाजाचे आजवर घनिष्ठ ऋणानुबंध राहिले आहेत. मातंग समाजामधील नेतृत्वाचा लोकनेते नाईक यांनी नेहमीच सन्मान केला आहे. यापुढे देखील मातंग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी  सर्वोत्परी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही संदीप नाईक यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास उमाकांत नामवाड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नामवाड, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, फकीरा पॅंथरचे संस्थापक- अध्यक्ष ॲड.गुरु सूर्यवंशी तसेच मातंग महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई