शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यादवनगरमध्ये महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 01:46 IST

लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना मदत केल्याचा राग मनात धरून महिलेला जबर मारहाण झाल्याचा प्रकार यादवनगरमध्ये घडला आहे. सदर महिलेवर वाशीतील पालिका

नवी मुंबई : लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना मदत केल्याचा राग मनात धरून महिलेला जबर मारहाण झाल्याचा प्रकार यादवनगरमध्ये घडला आहे. सदर महिलेवर वाशीतील पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रामअशिष यादव व तीन महिलांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिघा येथील यादवनगर परिसरात रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्या ठिकाणी राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेने त्याच परिसरातील एका पीडित कुटुंबाला मदत केली होती. त्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर त्याच परिसरातील तरुणाने लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी सदर मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी त्या महिलेने मदत केली होती. यावरून जावेद नावाच्या तरुणाला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली. याचाच राग मनात धरून काही महिला व पुरुषांच्या जमावाने त्या महिलेला जबर मारहाण केली, तर मारहाण करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रामअशिष यादव हे देखील होते, असे पीडित महिलेचे म्हणणे आहे. त्यांनी शिवीगाळ करीत आपल्याला घराबाहेर खेचून आणल्यानंतर लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली, तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकल्याचाही आरोप महिलेने केला आहे. या प्रकारात जखमी झालेल्या सदर महिलेवर वाशीतील मनपा रुणालयात उपचार सुरू आहेत. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेला तरुण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून यादव यांचा कट्टर कार्यकर्ता आहे, तर मारहाण झालेली महिला शिवसेनेची कार्यकर्ती आहे. महापालिका पोटनिवडणुकीत देखील त्यांच्यात राजकीय वाद झाला होता. अशातच पीडित कुटुंबाची बाजू घेत त्यांना मदत केल्याचा राग मनात धरून यादव यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार सदर महिलेने पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार रामअशिष यादव यांच्यासह तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.