शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून ढकलणा-या तरूणाची ओळख पटली, जुईनगर रेल्वेस्थानकातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:16 IST

लुटीच्या उद्देशाने तरुणीला रेल्वेतून ढकलणा-याची ओळख पटली असून, रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संतोष केनन (२८), असे त्याचे नाव असून तो पॉलिटेक्निकल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे

नवी मुंबई : लुटीच्या उद्देशाने तरुणीला रेल्वेतून ढकलणा-याची ओळख पटली असून, रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संतोष केनन (२८), असे त्याचे नाव असून तो पॉलिटेक्निकल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून पीडित तरुणीची बॅग व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.वाशी येथे राहणा-या ॠ तुजा बोडके हिला रेल्वेतून ढकलल्याचा प्रकार जुईनगर रेल्वेस्थानकात घडला होता. ती वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी असून, बडोदा येथे शिक्षण घेत आहे. शनिवारी ती घरी येत असताना पनवेलमधून वाशीकडे येणाºया लोकलमध्ये बसली होती. या वेळी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास लोकल नेरुळ ते जुईनगर रेल्वेस्थानकादरम्यान असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला होता. महिला डब्यात ती एकटीच असताना त्यामध्ये चढलेल्या एका तरुणाने तिला लुटण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी तिने त्याला प्रतिकार केला असता, सदर तरुणाने तिला चालत्या रेल्वेतून खाली ढकलले होते. त्यानंतर जुईनगर रेल्वेस्थानकात उतरून त्याने पळ काढला होता. या प्रकारात ॠ तुजाकडील बॅगमधील वस्तू, सोन्याचे दागिने व मोबाइल, या वस्तू चोरीला गेला होता. सुदैवाने लुटारूने तिला रेल्वेतून खाली ढकलले तेव्हा लोकल स्थानकात येत असल्याने गती कमी होती. यामुळे तिचे प्राण वाचू शकले. मात्र, घटनेनंतर ती पुढील रेल्वेने जखमी अवस्थेत वाशीला आली असता, कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी रेल्वे पोलिसांना माहिती दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान स्थानकातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या लुटारूची ओळख पटली. संतोष केनन (२८), असे त्याचे नाव असून तो कल्याणचा राहणारा आहे. शिवाय तो पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असल्याचेही समोर आले आहे. या माहितीनुसार जीआरपीच्या पथकाने बुधवारी रात्री त्याच्या कल्याणमधील राहत्या घरी धडक दिली. या वेळी तो घरी आढळून आला नाही. मात्र, घराच्या झडतीमध्ये ॠ तुजाची चोरी झालेली बॅग व कानातील सोन्याचे दागिने आढळून आले आहेत.