शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही नाव देत नाही ना? मग आम्हीच नवी मुंबई विमानतळाला नाव देतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2023 07:46 IST

दि. बा. पाटील यांच्या नामफलकाचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या  नामफलकाचे अनावरण करण्यात आले. राज्य आणि केंद्र शासनामार्फत नामकरणास विलंब होत आहे. यामुळे सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त नेत्यांनी पुढाकार घेऊन स्वतःच दिबांच्या नावाचे फलक लावून एकप्रकारे शासनाचा निषेध केला.

शासनाकडून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास उशीर होत असल्याने विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने हे फलक लावून शासनाला दिबांच्या नावाची आठवण करून दिली. यावेळी कृती समितीचे दशरथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, आमदार राजू पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, महेंद्र घरत यांच्यासह प्रकल्पग्रस्त संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विमानतळाच्या जागेवर तीन मोठमोठे फलक लावण्यात आले. या फलकावर लोकनेते दि. बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई, असे नाव लिहिण्यात आले आहे. 

शासनाकडून दि. बा. पाटील नामकरणाचा मंजूर ठराव केंद्र शासनाकडे पाठवला. त्याला मान्यता मिळायची आहे. विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे याकरिता प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने एकवटले आहेत. याकरिता अनेकवेळा मोर्चे तसेच आंदोलने प्रकल्पग्रस्तांनी यापूर्वीच केलेली आहेत. यावेळी दिबांच्या नावाच्या घोषणादेखील देण्यात आल्या. एकीकडे विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २०२३ मध्ये या ठिकाणाहून पहिले विमान उड्डाण करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मात्र हा विषय मागे पडत असल्याने प्रकल्पग्रस्त पुन्हा सक्रिय झाले.

मुख्यमंत्री शिंदेची घोषणा हवेत? प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन छेडले. मोर्चे काढले. त्यानंतर शासनाने दिबांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव पारित केला. त्यानंतर मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी विमानतळाला लवकरच त्यांचे नाव देण्यात येईल, असे जाहीर केले.  मात्र, त्याचे पुढे काय झाले? महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला का, असा सवाल प्रकल्पग्रस्त विचारू लागले आहेत.