शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात दहा रुपयांना मिळतोय मास्क, तरीही घेईनात..! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 09:53 IST

ओमायक्रॉन  कोरोना संसर्ग होत असल्याने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. 

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : पनवेल परिसरात कोरोना संसर्ग ओसरल्याने बिनधास्त झालेल्या नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कमी केल्याचे दिसून येते. त्यामुळे सॅनिटायझर आणि मास्कची विक्री काही प्रमाणात मंदावल्याचे औषध विक्रेत्याने सांगितले.  कोरोनाची लस घेतल्याले, आपण कोरोनामुक्त झालोय, असा गैरसमज नागरिकांमध्ये आहे. मात्र  ओमायक्रॉन  कोरोना संसर्ग होत असल्याने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. 

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना संख्या कमी झाल्यामुळे तसेच राज्यातील कोरोना संसर्ग ओसरल्यामुळे कोरोना नियमात शिथिलता देण्यात आली होती. त्यानुसार  प्रवास, कार्यक्रम, लग्न समारंभासाठी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेले नागरिक बिनधास्त वावरताना दिसून येत आहेत. सद्य स्थितीत ओमायक्रॉन संसर्गाचे  रुग्ण वाढल्याने कोरोना  नियम कडक करण्यात आले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात परदेश वारीतील  ६ ओमायक्रॉनबाधित आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यानुसार मास्कचा वापर, कार्यक्रमावर नजर ठेवण्यात येत आहे, तर पालिकेने ‘नो मास्क, नो एंट्री’ धोरण पुन्हा जोमाने सुरू केले आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे न संपल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्गापासून बचाव म्हणून मास्कचा वापर, वारंवार सॅनिटायझर लावणे, हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे या गोष्टी गरजेच्या आहेत. मात्र नागरिकांकडून           याकडे दुर्लक्ष होत आहे.                       पालिकेकडून  कारवाई करण्यात येत असली, तरी नागरिकांचा निष्काळजीपणा समोर येत आहे.  

मास्क लावणे गरजेचे…प्रशासनाने पनवेल परिसरात मास्क न लावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली असली तरी, मास्क न घालता फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही संसर्ग होऊ नये याकरिता मास्क वापरणे गरजेचे आहे. कोराेनाच नव्हे, तर इतर कोणत्याही संसर्गजन्य आजाराला दूर ठेवण्यासाठी मास्कचा वापर उपयुक्त आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. याने कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.

मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत घट    पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान बहुतांश नागरिकांच्या हातात किंवा खिशात सातत्याने सॅनिटायझरची बाटली अथवा स्प्रे ठेवणाऱ्या नागरिकांनी सॅनिटायझर वापरणे आता कमी केले आहे.      मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती कमी झाल्या आहेत. तरी नागरिक या  वस्तूंची खरेदी कमी करत असल्यामुळे ७० टक्क्यांपर्यंत विक्रीत घट झाल्याचे अनिल रूपकर या औषध विक्रत्याने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई