शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

By वैभव गायकर | Updated: September 13, 2025 17:56 IST

आळेकरी यांना युकेस्थित ऑफ रोड सेंटर यांच्या माध्यमातून सेंटरचे मालक मीस्टर बेन आणि डॅनियल यांनी नवोकोरी केटीएम बाईक देऊ केली.

वैभव गायकर

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : जगभ्रमंतीला निघालेल्या नवी मुंबई मधील योगेश आळेकरी यांची दुचाकी 28 ऑगस्ट रोजी युके मधील नॉटिंगहॅम मधुन चोरीला गेली होती. याबाबत रीतसर तक्रार नोंदवून देखील 15 दिवस उलटूनही आळेकरी यांना त्यांची दुचाकी मिळाली नाही. या घटनेचे पडसाद राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय माध्यमांमध्ये उमटल्यानंतर अनेकांनी आळेकरी यांच्यासाठी सोशल मीडियावर मोहीम चालवली. यातून आळेकरी यांना नवी मोटरसायकल मिळाली असून ते पुढच्या प्रवासाला निघाले आहेत. 

आळेकरी यांना युकेस्थित ऑफ रोड सेंटर यांच्या माध्यमातून सेंटरचे मालक मीस्टर बेन आणि डॅनियल यांनी नवोकोरी केटीएम बाईक देऊ केली. यामुळे योगेश यांचा आफ्रिका खंडाचा प्रवास सुरु राहणार आहे. दुचाकी चोरीला गेल्याने योगेश यांच्या पुढील प्रवासाबाबत साशंकता निर्माण झाली होती. दुचाकी सोबत योगेश यांचा भारतीय पासपोर्ट, मॅक बुक, 360 डिग्री कॅमेरा, कॅम्पिंगचे सामान, कपडे, रोख रक्कम, व्हिसा, महत्वाचे कार्ड, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आदी सर्वच चोरीला गेल्याने योगेश भारतात परत येण्याच्या विचारात होते. योगेश आळेकरी यांनी आजवर 17 देश गाठत तब्बल 18500 किमीचा प्रवास पूर्ण केला आहे.

नेपाळ, इराण, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, चीन, रशिया, युरोप, जर्मनी, बेल्जीयम, नॉर्वे यांसारख्या देशातून प्रवास केला आहे.आफ्रिका खंडात जवळपास 10 देशांना योगेश आळेकरी प्रवास करणार आहेत. वसुधैव कुटुंबकमचा संदेश देण्यासाठी आळेकरी ही भ्रमंती करत आहेत.

15 दिवसानंतर नॉटिंगहॅम पोलिसांना योगेश आळेकरी यांच्या दुचाकीचा शोध लावता आलेला नाही. याबाबत एका संशयिताला अटक देखील करण्यात आली होती. मात्र याबाबत विशेष काही माहिती मिळू शकली नसल्याने चोरटे अद्याप फरारच आहेत. युके सारख्या देशात एखाद्या चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद होऊन देखील चोरटे पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्यांची बाब असल्याचे आळेकरी म्हणाले.

मला नवीन केटीएम बाईक मिळाली असल्याने मी संबंधितांचा आभारी आहे. लवकरच माझा आफ्रिकेकडील देशांच्या प्रवासाला सुरुवात होईल. मला नवीन गाडी मिळाली असली तरी मला ती भारतात आणताना जवळपास तिप्पट किंमत विविध टॅक्स रूपाने मोजावी लागणार आहे. मात्र, माझा प्रवास मध्येच न थांबता पुढील मार्गावर असणार आहे याचा मला आनंद आहे. - योगेश आळेकरी

टॅग्स :United Kingdomयुनायटेड किंग्डम