शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांना ‘योगमंत्र’

By admin | Updated: June 22, 2016 02:19 IST

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिकांना आरोग्याचा कानमंत्र देण्यासाठी मंगळवारी विविध स्तरांवर योगपर्वाचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागातील युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिकांना आरोग्याचा कानमंत्र देण्यासाठी मंगळवारी विविध स्तरांवर योगपर्वाचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागातील युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हे यंदाच्या योगदिनाचे वैशिष्ट्य ठरले. सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार अशा विविध माध्यमातून समाजात योगविद्येविषयी जनजागृती करण्यात आली.वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या योग शिबिराच्या पहिल्या सत्रात योगासनांबरोबरच प्राणायामाचाही अभ्यास करण्यात आला. योग शिबिराच्या दुसऱ्या सत्रात शहरातील १० पेक्षा अधिक शाळा सहभागी झाल्या होत्या. अभ्यासातील एकाग्रता वाढविण्यासाठी योगविद्येचा अभ्यास करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी माहिती कृष्ण कुमार यांनी विद्यार्थ्यांना दिली. शिस्तबध्द पध्दतीत विद्यार्थ्यांनी या संपूर्ण योगसत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वाशीतील फादर एग्नल शाळा, साईनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल, आयसीएल शाळा, आयईएस शाळा, रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, सेंट लॉरेन्स, टिळक स्कूल, जयपुरीयार स्कूल तसेच खारघर, बेलापूर आदी विभागातील शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांना ताडासन, वृक्षासन, अर्धभुजंगासन, पादहस्तासन, त्रिकोणासन आदी योगासने शिकविण्यात आली. या योग शिबिरात डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वतीने मोफत दंतचिकित्सा शिबिर राबविण्यात आले. आजचे तरुण उद्याचे भविष्य ठरणार असून या तरुणांना नियमित योगसाधना करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. आर्ट आॅफ लिव्हिंगचे कृष्ण कुमार यांना योगाभ्यास हीच जगण्याची खरी कला असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.यावेळी आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गिल, द आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेचे प्रशिक्षक सौरव घोष, संदीप महाजन, रत्नेश्वर शेट्ये, प्रमोद कोकणे, दीपक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.पतंजली योग समितीमार्फत नवी मुंबई महानगरपाविका शाळेतील विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यात आल.े वाशीतील शाळा क्र. २८ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्व मनपा शाळांमध्ये योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, शिक्षण विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शिक्षणाधिकारी रुचिका संख्ये, योगेश हन्नुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.