शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यादवची आठही बँक खाती रिकामी

By admin | Updated: September 17, 2016 02:24 IST

माथाडींच्या बोगस घरवाटप प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या प्रकारात अनेकांची कोट्यवधीची फसवणूक झालेली

नवी मुंबई : माथाडींच्या बोगस घरवाटप प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या प्रकारात अनेकांची कोट्यवधीची फसवणूक झालेली असून पोलिसांनी यादवच्या बँक खात्याची देखील तपासणी केली. मात्र यादवची आठही बँक खाती रिकामीच आढळून आली आहेत.माथाडी कामगारांची घरे बिगर माथाडींना देण्याचे आमीष दाखवून अनेकांची कोट्यवधीची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. दिलीप यादव, संतोष चव्हाण व संतोष जाधव अशी त्यांची नावे आहेत. यादव हा सूत्रधार असून इतर दोघांचा या प्रकरणात कितपत सहभाग आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. नेत्यांच्या कोट्यातून घरे देण्याचे आमिष दाखवून यादवने मागील दोन वर्षात सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. माथाडी कामगार युनियनचे लेटरहेड, पदाधिकाऱ्यांच्या सह्या तसेच सिडकोच्या स्टँपचा वापर करुन अनेकांना फसवण्यात आलेले आहे. युनियन कार्यालयातच काम करत असल्याची संधी साधत यादवने लेटरहेड व सह्यांचा गैरवापर करुन हा प्रकार केल्याचे युनियनचे म्हणणे आहे. परंतु या प्रकरणात इतरही काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता तक्रारदारांनी वर्तवलेली आहे. त्यानुसार यादवच्या संपर्कात असलेल्या व युनियनशी संबंधित काही व्यक्तींवर पोलीस नजर ठेवून आहेत. तर यादवने फसवणुकीसाठी वापरलेल्या युनियनच्या लेटरहेडवरील आवक जावक खरा की खोटा याची पडताळणी करण्यासाठी त्या काळात झालेल्या पत्रव्यवहाराची देखील पोलीस चाचपणी करणार आहेत.दरम्यान, यादवच्या अटकेनंतर एपीएमसी पोलिसांनी त्याच्या विविध बँकेतील आठ खात्यांची तपासणी सुरू केली होती. त्यामध्ये एका वेळी लाखो रुपयांच्या व्यवहाराच्या नोंदी असून सुमारे ५ ते ६ कोटींची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. परंतु सद्यस्थितीला सर्व खात्यामध्ये मिळून साधारण ८ ते १० हजार रुपये आहेत. त्यामुळे यादवच्या बँक खात्यात जमा झालेली कोट्यवधीची रक्कम रातोरात गेली कुठे याचा उलगडा करण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. (प्रतिनिधी)