शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंचतारांकित हॉटेल्ससाठी जागतिक निविदा, सिडकोचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 06:54 IST

सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २0१९ ची डेडलाइन निर्धारित केली आहे. त्यादृष्टीने कामाला गतीही दिली आहे. प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे सुरू करतानाच विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल्सचा प्रस्तावही सिडकोने तयार केला आहे. त्यानुसार लवकरच चार हॉटेल्ससाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई -  सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २0१९ ची डेडलाइन निर्धारित केली आहे. त्यादृष्टीने कामाला गतीही दिली आहे. प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे सुरू करतानाच विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल्सचा प्रस्तावही सिडकोने तयार केला आहे. त्यानुसार लवकरच चार हॉटेल्ससाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. अलीकडेच विमानतळ उभारणीची आर्थिक निविदाही निश्चित करण्यात आली. त्यानुसार जीव्हीके कंपनीला विमानतळ उभारणीचा ठेका देण्यात आला आहे. तसेच भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाºया दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच उलवे टेकडीची उंची कमी करणे, नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या उपºया विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, विमानतळ गाभा क्षेत्राचे सपाटीकरण आदी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची प्रकल्पपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाला आवश्यक असणाºया सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून या क्षेत्रात जागतिक दर्जाचे पंचतारांकित हॉटेल्स उभारण्याची सिडकोची कल्पना आहे. त्यासाठी आवश्यक तितके भूखंड आरक्षित करून ठेवले आहेत. या भूखंडांवर पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा काढून इच्छुक कंपन्यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सांगितले.नवी मुंबई विमानतळावरून वर्षाला पाच ते साडेपाच कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दरवर्षी एक कोटी प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रीनफिल्ड विमानतळ असल्याने मुंबई विमानतळावरील ताण कमी होणार आहे. देश-विदेशातील प्रवाशांना नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करावा लागणार आहे. त्याअनुषंगाने विमानतळ परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यास दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तत्पूर्वी पंचतारांकित हॉटेल्सचे नियोजन होणे आवश्यक असल्याने सिडकोने त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.हॉटेलसाठी ३५ भूखंड आरक्षितदेश-विदेशातून येणाºया प्रवाशांना, उद्योजकांना विमानतळ परिसरातच निवासाची सोय असणे अपेक्षित असते. त्यानुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अंतरा-अंतराने वीस ते पंचवीस पंचतारांकित हॉटेल्स आहेत. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे विमानाचे उड्डाण रद्द होते. अशावेळी परदेशी प्रवाशांना तासन्तास विमानतळावर बसून राहणे शक्य होत नाही. विमानतळ परिसरात असणारी पंचतारांकित हॉटेल्स या परिस्थितीत उपयुक्त ठरतात. या पार्श्वभूमीवर सिडकोने नवी मुंबई विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल्ससाठी ३0 ते ३५ भूखंड आरक्षित ठेवले आहेत.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई