शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना थकबाकी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:22 IST

६०४२ कंत्राटी कामगारांना लाभ : ६९ कोटी ७५ लाख रुपये देण्याच्या प्रस्तावास मंजुरी

नवी मुंबई : महानगरपालिका कर्मचाऱ्यांना १४ महिन्यांची थकबाकी देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. ६०४२ कामगारांना थकबाकी देण्यासाठी पालिकेला ६९ कोटी ७५ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. प्रत्यक कामगाराला ९० हजार ते एक लाख रुपये मिळणार असून, या वर्षीची दिवाळी उत्साहात साजरी करता येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात सातवा क्रमांक मिळविला आहे. दोन वर्षांपूर्वी घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला होता. गतवर्षी नागरिकांच्या सहभागासाठी देशात प्रथम क्रमांक मिळविला. राज्यातील स्वच्छ शहर हा नावलौकिक महापालिकेने अनेक वर्षांपासून टिकवून ठेवला आहे. राज्य शासनाने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राबविल्यानंतर पहिल्याच वर्षी पहिला क्रमांक नवी मुंबईने पटकावला होता. शहर स्वच्छतेमध्ये सफाई व इतर कंत्राटी कामगारांची महत्त्वाची भूमिका आहे. कंत्राटी कामगारांच्या परिश्रमामुळेच हे यश मिळाले असल्यामुळे पालिकेने गतवर्षीच्या स्वच्छतेच्या स्पर्धेमध्ये सर्व कामगारांच्या छायाचित्रांचे होर्डिंग तयार करून त्यांना स्वच्छतादूताची उपाधी दिली होती. नुकत्याच कोल्हापूर व सांगलीमध्ये आलेल्या पुरामध्येही नवी मुंबईमधील सफाई कामगारांनी महत्त्वाची कामगिरी केली असून, त्यांच्या कामाचे कोल्हापूरवासीयांनीही कौतुक केले होते. कंत्राटी कामगारांचे योगदान लक्षात घेऊन महापालिका प्रशासनही त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत आहे. यापूर्वी किमान वेतन खूपच कमी असल्यामुळे कामगारांसाठी समान कामास समान वेतन सुरू केले होते. शासनाने २४ फेब्रुवारी २०१५ मध्ये अधिसूचना काढून सर्व विभागातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन अदा करण्याचा निर्णय घेतला होता. सुधारित किमान वेतन समान वेतनापेक्षा जास्त असल्यामुळे नवी मुंबईमधील कंत्राटी कामगारांनाही पुन्हा किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी मुंबई महानगरपालिकेने जून २०१७ पासून कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू केले. यामुळे उर्वरित २७ महिन्यांचा फरक कामगारांना मिळावा, अशी मागणी समाज समता कामगार संघाने केली होती. या मागणीसाठी निवेदन व आंदोलनही केले होते. प्रशासनाने मे २०१६ ते मे २०१७ या १३ महिन्यांचा वेतनामधील फरक कर्मचाºयांना या पूर्वीच दिला होता. फेब्रुवारी २०१५ ते एप्रिल २०१६ या १४ महिन्यांचा फरक कामगारांना देण्यात यावा, अशी मागणी कामगारांनी लावून धरली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी थकीत रकमेचा ठराव मंजूर होणे आवश्यक होेते. प्रशासनाने गुरुवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव मंजुरीसाठी आणला होता. १४ महिन्यांच्या थकबाकीसाठी ६९ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार असून, सभागृहाने सर्वसहमतीने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.यामुळे कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.कामगारांचा सण आनंदातच्महापालिकेच्या, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान, शिक्षण, क्रीडा, विष्णूदास भावे नाट्यगृह, मालमत्ता, आरोग्य, मोरबे धरण, पाणी पुरवठा विभाग, मलनि:सारण, विद्युत, स्मशानभूमी व इतर विभागांमधील कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.च्गणेश उत्सवापूर्वी महापालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीपूर्वी फरकाची रक्कम कामगारांना मिळण्याची शक्यता असून, प्रत्येक कामगारांना किमान ९० हजार ते एक लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे.कंत्राटी कामगारांना १ जून २०१७ पासून किमान वेतन लागू करण्यात आले. फेब्रुवारी २०१५ पासून तब्बल २७ महिन्यांचा फरक मिळावा, यासाठी आम्ही पाठपुरावा केला होता. यापूर्वी १३ महिन्यांची थकबाकी दिली होती. उर्वरित १४ महिन्यांची रक्कम देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केल्यामुळे कामगारांना न्याय मिळाला असून यासाठी सहकार्य करणाºया सर्वांचे आभार.- मंगेश लाड, सरचिटणीस, समाज समता कामगार संघकामगारांनीही दिला होता लढाच्किमान वेतन लागू करावे यासाठी कंत्राटी कामगारांनीही प्रदीर्घ लढा दिला. आयुक्त, महापौर व सर्व लोकप्रतिनिधींनी किमान वेतनाचा निर्णय घेतल्यानंतर फरकाची रक्कम मिळावी यासाठीही कामगारांनी लढा सुरूच ठेवला. किमान वेतनाचा फरक मिळावा यासाठी कामगारांनी तीन वेळा कामबंद आंदोलन केले व महापालिकेवर मोर्चाही काढावा लागला होता.