शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कामगारांना आर्थिक साहाय्य मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:20 IST

विमा संरक्षण देण्याचेही आश्वासन : रेल्वेने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात माथाडी कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी सर्व कामगारांना राखीव निधीतून पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य करण्याच्या सूचना माथाडी मंडळांना करण्यात आल्या आहेत. कामगारांना विमा संरक्षण व रेल्वेने प्रवास करण्यासाठी क्यूआर कोड ई-पास देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, सुरक्षारक्षक युनियनचे अजिंक्य भोसले उपस्थित होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती, गॅस सिलिंडर कंपन्या, खत कारखाने, रेल्वे धक्का व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार काम करत आहेत. माथाडी कामगार व सुरक्षारक्षकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे प्रवास करण्याची परवानगी मिळावी. काम करताना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी कामगार नेत्यांनी बैठकीत केली. उपमुख्यमंत्र्यांनीही कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. माथाडी कामगार व सुरक्षारक्षकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना विमा संरक्षण देण्यात येईल. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी क्यूआर कोड ई-पास देण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.मार्च महिन्यापासून अनेक माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. अनेक कंपन्या बंद आहेत.पत्र पाठवून दिली निर्णयाविषयी माहितीच्सुरू असलेल्या कंपन्यांचा व्यवसाय कमी झाला आहे. यामुळे कामगारांना घरखर्च भागविणे अवघड झाले आहे. माथाडी मंडळांनी त्यांच्या राखीव निधीमधून पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णयही घेतला आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने कामगार आयुक्त व माथाडी मंडळांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून निर्णयाविषयी माहिती दिली.