शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रेप्रोमधील कामगारांचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: May 12, 2017 01:57 IST

नियमित पगारवाढ मिळावी, महागाई भत्ता व इतर मागण्यांसाठी रेप्रो इंडिया लिमिटेड कंपनीमधील २८४ कामगारांनी ८ एप्रिलपासून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नियमित पगारवाढ मिळावी, महागाई भत्ता व इतर मागण्यांसाठी रेप्रो इंडिया लिमिटेड कंपनीमधील २८४ कामगारांनी ८ एप्रिलपासून आंदोलन सुरू केले आहे. उपोषणानंतरही व्यवस्थापनाने अद्याप मागण्या मान्य केल्या नसून आंदोलन दडपण्याचा हालचाली सुरू झाल्या असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. महापेमधील रेप्रो इंडिया कंपनीमध्ये २८४ कामगार जवळपास २२ वर्षांपासून काम करत आहेत. कंपनी व्यवस्थापन कामगारांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देत नसल्याने कामगारांनी राजन राजे यांच्या धर्मराज्य कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून ८ एप्रिलपासून आंदोलन सुरू केले आहे. कामगार न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने नवीन कामगार भरती, कच्चा माल, मशिनरी स्थलांतरास स्थगिती दिली आहे. परंतु कंपनी खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने कच्चा माल बाहेर काढत आहे. याशिवाय कंत्राटी कामगारांकडून काम करून घेतले जात आहे. संप मोडीत काढण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप केला आहे. कामगार आयुक्तांकडून दोन वेळा व्यवस्थापनाला चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आले आहे. परंतु एकदाही व्यवस्थापनाकडून कोणीही चर्चेसाठी उपस्थित राहिलेले नाही. कामगारांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही काहीही मार्ग काढला जात नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली असून आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.