शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एजन्सीअभावी रखडले विंधण विहिरींचे काम

By admin | Updated: May 3, 2016 01:00 IST

पनवेल तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाणीटंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य आराखड्यामध्ये ३६ गावे आणि आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. गाव-वाड्यांवरील

पनवेल : पनवेल तालुक्यातील अनेक गाव-पाडे पाणीटंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य आराखड्यामध्ये ३६ गावे आणि आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. पनवेल तालुक्यातील २ गावे आणि ११ वाडीतील १३ विंधण विहिरींना मंजुरी मिळाली आहे. मात्र त्या खोदण्याकरिता एजन्सीच मिळत नसल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून हे काम रखडले आहे.उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. अनेक गाव-वाड्या पाण्यावाचून हैराण झाल्या आहेत. पनवेल तालुक्यात १३ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे. यासाठी जवळपास साडेचार लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र मंजुरी मिळून एक महिना झाला तरी विंधण विहिरी खोदण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आदिवासी वाडीतील नागरिक अद्याप तहानलेलेच आहेत. तालुक्यात पाणीटंचाईची समस्या मार्चपासून अधिक गंभीर झाली आहे. आदिवासी वाड्यांवरील महिलांना भर उन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तलाव, नदीपात्र, नाले कोरडे पडल्याने दैनंदिन वापरासाठीही पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. (वार्ताहर) प्रशासनाच्या पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात ३६ गावे आणि वाड्यांचा समावेश करण्यात आला. याशिवाय १३ विंधण विहिरींना मंजुरी देण्यात आलेली असून तालुक्यातील मालडुंगे येथील देहरंग व धोदाणी या दोन गावात तसेच बेलवाडी, गराडा, सावरमाळ, कामटवाडी, धामोळे, फणसवाडी, बुर्दुलवाडी, मोरबे आदिवासी वाडी, ठाकूरवाडी, भल्याची वाडी, पेरूची वाडी या गाव आणि वाड्यांमध्ये विंधण विहिरी खोदण्यात येणार आहेत. मात्र खोदकामासाठी पनवेलमध्ये महिनाभरापासून एजन्सी मिळत नसल्यामुळे काम रखडले आहे. प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी १३ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे. मात्र या विहिरी खोदण्यासाठी एजन्सीच तयार होत नाही. आमचे प्रयत्न सुरू असून आठवड्याभरात विहिरींचे खोदकाम सुरू करण्यात येईल. - रवींद्र चव्हाण, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पनवेल