शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुढील दोन महिन्यात पनवेल मधील मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे काम मार्गी;हरित ऊर्जेद्वारे दोन हजार मेगावॅट वीजेची उपलब्धता

By वैभव गायकर | Updated: May 12, 2024 14:30 IST

पनवेल मध्ये सध्य स्थितीत काम अंतिम टप्प्यात असलेल्या मुंबई ऊर्जा प्रकल्पामुळे मुंबई महानगरात दोन हजार  मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे.

वैभव गायकर

पनवेल : पनवेल मध्ये सध्य स्थितीत काम अंतिम टप्प्यात असलेल्या मुंबई ऊर्जा प्रकल्पामुळे मुंबई महानगरात दोन हजार  मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणारी वीज ही हरित ऊर्जा प्रकाराची असल्याने ग्राहकांच्या खिशावरचा भार काही प्रमाणात का होईना, हलका होणार आहे.दोन महिन्यात हे काम पूर्णत्वास येणार आहे.

गुजरात राज्यातील कच्छमधल्या दोदरा येथे सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी वीज मुंबई महानगर प्रदेशाकरिता आणण्याचा उपक्रम ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारणतः दोन ते तीन महिन्यांचा  कालावधी लागणार आहे.सध्या कार्यान्वित असलेल्या अति उच्च दाबाच्या वीजवाहिन्या वाढलेली विजेची मागणी लक्षात घेता वीज पारेषण करण्यासाठी पुरेशा सक्षम नाहीत. साधारणतः पाच ते सहा दशकांपूर्वी उभारलेले हे वीजवाहिन्यांचे जाळे. दिवसेंदिवस वाढत जाणारी विजेची मागणी त्यामुळे अतिरिक्त वीज आणण्यासाठी या वीजवाहिन्या प्रभावी ठरत नाहीत. यासाठी अति उच्चदाब वीजवाहिन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार करणे, ही आता वीजकंपन्यांपुढे मोठी गरज बनली आहे.

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून अति उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांचे जाळे तयार करण्याचे काम वेगाने सुरु आहे.पनवेल मध्ये प्रकल्पाला होणार विरोध पाहता भूसंपादनाच्या बाबतीत स्थानिक जमीनधारकांना समाधानकारक मोबदला देण्यासाठी जे शक्य होईल, ते सर्व करण्याचा मुंबई ऊर्जा प्रकल्पाची भूमिका आहे.एकीकडे वाढलेला विजेचा वापर तर दुसरीकडे अधून मधून खंडित होणारा विद्युतपुरवठा यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच वीजवितरण नियोजनाच्या दृष्टीने पूर्वनियोजित वीज बंद है देखील नागरिकांची नवी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे मुंबई ऊर्जा मार्ग व त्यासारख्या आणखीन प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त वीज पारेषण क्षमता निर्माण न केल्यास भविष्यात विजेचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासणार आहे.मुंबई महानगर,नवी मुंबई तसेच नव्याने होऊ घातलेल्या महामुंबईची विजेची मागणी लक्षात घेता हि सर्व गरज या प्रकल्पामुळे भरून निघणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश झपाट्‌याने विकसित होत आहे. सुनियोजित विकासाची सगळ्यात पहिली गरज म्हणजे अखंडित वीजपुरवठा, ज्याप्रमाणात या प्रदेशाचा विकास होतो आहे. ते पाहता येत्या काळात अतिरिक्त विजेची गरज भासणार आहे. सध्याच्या पारेषण प्रणालीमध्ये नव्या अति उच्च दाब वाहिन्यांची नितांत गरज आहे. त्यामुळे नियोजित प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त वीज वाहिन्या उभारुन भविष्यात विजेचा हा तुटवडा भरून काढणे सोपे होणार आहे.

-डॉ. संजीव कुमार(अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण)