शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपुलावरून आत्महत्यांना बसणार आळा, सुरक्षा जाळी बसविण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:17 IST

Vashi : मुंबई व नवी मुंबईला जोडणारा वाशी खाडीपूल हा आत्महत्येचे ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

नवी मुंबई : वाशी खाडीपुलावरून होणाऱ्या आत्महत्येच्या घटनांना अखेर आळा बसणार आहे. पुलाला सुरक्षा जाळी नसल्याने नैराश्यात असलेल्या व्यक्तींना तेथून उडी मारण्याची संधी मिळत होती. त्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने उद्भवत असलेल्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठवला होता.मुंबई व नवी मुंबईला जोडणारा वाशी खाडीपूल हा आत्महत्येचे ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. प्रतिवर्षी साधारण ५० हून अधिक व्यक्ती या खाडीपुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत असतात. पुलाच्या सुरक्षा कठड्याची उंची कमी असल्याने त्यांना पुलावरून उडी मारणे सहज शक्य होते. नुकतीच एक महिला खाडीत निर्माल्य टाकत असताना तोल जाऊन पडली होती. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पुलाच्या सुरक्षा कठड्याची उंची वाढवावी अथवा जाळी उभारण्याची मागणी वाहतूक व शहर पोलिसांकडून सातत्याने होत होती. त्या अनुषंगाने अनेकांनी वेळोवेळी पाहणी दौरेदेखील केले होते. खाडी पुलावरून उडी मारणाऱ्या व्यक्तींच्या बचावासाठी पोलीस, अग्निशमन तसेच मच्छीमार बांधव यांना धोका पत्करावा लागत होता. पर्यायी पुलालगत वाशी पोलिसांची दिवस-रात्र गस्त ठेवण्यात आली आहे. वेळप्रसंगी त्यांच्या मदतीला मच्छीमार बांधव धावून येतात. यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नात पुलावरून उडी मरणाऱ्यांपैकी बहुतांश व्यक्तींचे प्राण वाचवण्यात आले आहेत. परंतु पोलिसांकडून मागणी होऊनदेखील पुलावर सुरक्षा जाळी बसवली जात नसल्याने आत्महत्यांची मालिका सुरूच आहे. त्याबाबत लोकमतने अनेकदा वृत्त प्रसारित करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर खाडीपुलाभोवती सुरक्षा जाळी बसण्याच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे. त्यासाठी चाचणीकरिता जाळी बसवण्यात आली आहे. लवकरच पुलाच्या दोन्ही बाजूंचा मोकळा भाग या जाळीने बंदिस्त केला जाणार आहे. त्यामुळे नैराश्यात आत्महत्येच्या प्रयत्नात खाडीपुलावरून उडी मारणाऱ्यांना आळा बसणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई