शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:46 IST

कामोठेकरांचा विरोध : टाळेबंदीचा फायदा घेतल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : मानसरोवर रेल्वे स्थानकासमोर सिडकोच्या गृहनिर्माण उभारणी प्रकल्पाला कामोठेतील नागरिकांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. गृहनिर्माण प्रकल्प या जागेवर नको, अशी मागणी सिडकोकडे रहिवाशांनी केली आहे. टाळेबंदीचा फायदा घेत, सिडकोने पुन्हा काम सुरू केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.सिडकोकडून नवी मुंबईसह पनवेल परिसरातील बस टर्मिनलवरती पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधली जाणार आहेत. सिडकोने कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, खारघर या ठिकाणी वसाहती निर्माण करताना, सिडकोकडून वेगवेगळ्या कारणासाठी भूखंड रिकामे ठेवले होते. यात बस टर्मिनलसाठीही कॉलनीत प्लॉट ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर, मानसरोवर, खांदेश्वर, खारघर रेल्वे स्थानक येथेही जागा आहे.घरकुल योजनेंतर्गत डिसेंबर महिन्यात ठेकेदाराने संबंधित जागा ताब्यात घेतले होती. मात्र, हा प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात यावा, याबाबत कामोठेकरांसह नागरी हक्क समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे, तसेच न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे. नागरी हक्क समितीने पालकमंत्री आदिती तटकरे यांना देऊन काम बंद करण्याची मागणी केली आहे.प्रकल्पाला आजहीतीव्र विरोधबस व ट्रक टर्मिनलवरती बांधण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या जागेला आजही रहिवाशांकडून विरोध दर्शवला जात आहे. सिडकोचा एवढा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्नही विचारला जात आहे. लवकर काम बंद न केल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.