शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कालवा वितरण प्रणालीची कामे ठप्प

By admin | Updated: April 4, 2016 02:06 IST

जलयुक्त शिवाराची कामे राज्यभरात मोठ्या प्रमाणात सुरू असताना पेणमधील जलसमृद्धीचे श्रीमंतीचे वैभव धरणातच पडून आहे.

पेण : जलयुक्त शिवाराची कामे राज्यभरात मोठ्या प्रमाणात सुरू असताना पेणमधील जलसमृद्धीचे श्रीमंतीचे वैभव धरणातच पडून आहे. हेटवणे, आंबेघर धरणाचा पाणीसाठा कृषीक्षेत्रासाठी वापर करून पेणमधील ६६६८ हेक्टरवर सिंचनक्षेत्र अपेक्षित असताना राज्य शासनाने गेल्या पंधरा वर्षांत हेटवणे प्रकल्पाच्या वितरिकेची १८ किमी कामे केली आहे.हेटवणे व आंबेघर धरणाच्या ओलिताखाली शेतजमीन आल्यास पेणमधील हरितक्रांतीद्वारे मुंबईसह उपनगरांना फ्रेश भाजीपाला, फळे पुरवठा होणार आहे. पेणच्या शेतकऱ्यांनी एसईझेड प्रकल्पाला हद्दपार केले. त्यामधील २२ गावे एसईझेड प्रकल्पात होती. तशीच या गावांचे क्षेत्र हेटवणे प्रकल्पांच्या ओलिताखाली ही होते. मात्र एसईझेड प्रकल्प २००५ साली आल्यानंतर हेटवणे कालवा विभागाने वितरिकेची कामे ठप्प केली. भूमिगत कालव्यासाठी आलेले मोठमोठे सिमेंटचे पाइप आजतागायत पडून आहेत. पूर्वेला धरणाची रेलचेल तर पश्चिमेला अरबी समुद्रामार्गे मुंबई शहर तासभरात अंतरावर तर रेल्वे व बसप्रवास अडीच तासांचे अंतर येणाऱ्या प्रस्तावित प्रकल्प विकासकांनी तत्कालीन आघाडी सरकारच्या कालखंडात सक्तीचे भूसंपादन लादून जमिनी गिळंकृत करण्याचा डाव सपशेल फसला आणि शेष राहिला म्हणजे हेटवण्याच्या पाण्यावर हरितक्रांतीची नवी पालवी फुटावी ही समग्र शेतकऱ्यांची आशा आकांक्षा आहे.या कामासाठी लागणारा निधी देण्यासाठी अप्पर सचिव वित्त व नियोजन विभागाने यासाठी भरीव तरतूद करून मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वर्षभरात ही कामे पूर्ण करावयाची असतील तर हेटवणे कालवा विभागाने मरगळ झटकून कामाला लागले पाहिजे. (वार्ताहर)