शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

शाई नदीवरील पुलाचे काम तीन वर्षांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 00:50 IST

शहापूर-किन्हवली-सोगाव-कोचरे-टोकावडेमार्गे नगर हा शहापूर ते नगरदरम्यानचा जवळचा मार्ग मानला जातो.

टाेकावडे :  शहापूर व मुरबाडला जोडणारा शाई नदीवरील सोगाव-कोचरे दरम्यानचा जुना पूल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने नागरिकांचा संपर्क तुटतो. यामुळे माजी आमदार पांडुरंग बरोरा व आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून नाबार्डमधून शाई नदीवर कोचरे येथे नवा पूल मंजूर करण्यात आला. चार कोटी २५ लाख इतका निधी मंजूर होऊनही या नव्या पुलाचे काम तीन वर्षे रखडले आहे. २०१७ पासून सुरू झालेल्या कामाला गती मिळत नसल्याने फक्त पाच खांब उभे राहिले आहेत. पुलाचे काम कासवगतीने सुरू असल्यानेच माळशेजकडे जाणारा हा जवळचा व महत्त्वाचा मार्ग वारंवार बंद होतो. 

शहापूर-किन्हवली-सोगाव-कोचरे-टोकावडेमार्गे नगर हा शहापूर ते नगरदरम्यानचा जवळचा मार्ग मानला जातो. त्यामुळे शहापूरहून नगरकडे जाणारे बहुतांंश वाहतूकदार सरळगावऐवजी सोगाव-कोचरेमार्गे माळशेजकडे जातात. मात्र, या मार्गावरचा जुना पूल कमी उंचीचा व मोडकळीस आलेला असल्याने दर पावसाळ्यात वाहतूक बंद ठेवावी लागते. त्यामुळे सोगाव परिसर व कोचरे परिसरातील टोकावडे, शिरोशी, माळ, खापरी, सोगाव, किन्हवली, टाकीपठार, खरांगण या गावांचा अनेक दिवस संपर्क तुटतो. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई