शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

दोन वर्षांपासून रखडले ऐरोली नाट्यगृहाचे काम

By admin | Updated: February 23, 2017 06:36 IST

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये भव्य नाट्यगृह

नामदेव मोरे / नवी मुंबईवाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये भव्य नाट्यगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने २०१३ मध्ये घेतला. २०१४ मध्ये कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. परंतु राजकीय वाद व प्रशासकीय उदासीनता यामुळे काम ठप्प झाले असून ऐरोलीकरांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील पूर्ण न झालेल्या प्रकल्पामध्ये ऐरोली मधील नाट्यगृहाचा समावेश आहे. वाशीमध्ये मनपाचे विष्णुदास भावे नाट्यगृह आहे. परंतु ऐरोली परिसरातील नागरिकांसाठी हे ठिकाण दूर आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना नाटक व मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता येत नाहीत. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सेक्टर ५ मधील भूखंड क्रमांक ३७ वर नवीन नाट्यगृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले. १३०४६ चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळाच्या भूखंडावर १६ मीटर उंचीचे व ४ मजली नाट्यगृह बांधण्यात येणार होते. यामध्ये तळमजल्यावर तिकीटगृह, रंगीत तालीम कक्ष, पहिल्या मजल्यावर मेकअप रूम, दुसऱ्या मजल्यावर ग्रीनरूम, प्रशासकीय दालन, रंगमंचासह बहुउद्देशीय सभागृह, तिसऱ्या मजल्यावर अधिकारी कक्ष, २ अतिथीगृह, अशी व्यवस्था करण्यात येणार होती. तळघरामध्ये ९४ चारचाकी व ४१ दुचाकी वाहने उभी करण्याचे नियोजन केले होते. महापालिकेने २१ आॅगस्ट २०१४ मध्ये नाट्यगृहाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. एक वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात पायासाठी केलेल्या खोदकामाव्यतिरिक्त काहीही काम झालेले नाही. नाट्यगृहाचे काम मार्गी लावण्यासाठी नगरसेवक एम. के. मढवी यांनी पाठपुरावा केला होता. ते राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असताना नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले होते. पण त्यांनी निवडणुकीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर नाट्यगृहाचे काम ठप्प झाले. यामुळे राजकीय हस्तक्षेपामुळे काम थांबल्याचे बोलले जात होते. परंतु आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रशासनामधील राजकीय हस्तक्षेप मोडीत काढला. प्रशासनाच्या कामामध्ये कोणत्याही पक्षाचे नेते हस्तक्षेप करत नाहीत. असे असतानाही ८ महिन्यात नाट्यगृहाचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. च्ऐरोलीमध्ये नाट्यगृहाचे बांधकाम करण्याचा मूळ प्रस्ताव ५४ कोटी रूपयांचा आहे. महापालिकेने बांधकामासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. डिसेंबर २०१५ पर्यंत जवळपास ३८ लाख रूपये खर्च झाले आहेत. पण प्रत्यक्षात काम काहीही झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये काम थांबले असून वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे बांधकामाचा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेला हे काम पूर्णत्वास न्यायचे नव्हते तर ते सुरू का केले असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.