शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

परिचितांकडूनच महिलांचा विश्वास‘घात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:13 IST

नवी मुंबई, पनवेलमधील परिस्थिती : दोन वर्षांत महिला अत्याचाराच्या १०५० घटना

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेलमध्ये महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मागील दोन वर्षांत महिला अत्याचाराच्या १,०५० घटना घडल्या आहेत. त्यात बलात्कार, हुंडाबळी यासह लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचाही समावेश आहे. यापैकी बहुतांश गुन्हे हे संबंधित महिला व मुलीच्या परिचयाच्या व्यक्तींकडूनच घडले आहेत. 

गुजरात येथील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नदीत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्यभरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतदेखील अशाच त्रासाला कंटाळून महिलांनी आत्महत्या केल्याचे किंवा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सासरच्या जाचासह समाजातील इतर घटकांकडूनदेखील महिलांवर होणारे अत्याचार तितकेच गंभीर आहेत. मागील दोन वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात महिला अत्याचाराच्या १ हजार ५० घटना घडल्या आहेत. त्यापैकी ४३८ गुन्ह्यांची नोंद मागील वर्षभरात झाली आहे. त्यात विनयभंग व बलात्काराच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे. या वेळी अत्याचार करणारी व्यक्ती ही महिलेच्या परिचयातीलच असल्याचे तपासात समोर आले आहे. यावरून संबंधितांनी नियोजनबद्धरीत्या महिलेला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. बलात्काराच्या १२५ घटनांमध्ये लग्नाचे आमिष दाखवून ४५ घटना घडल्या आहेत. तर ओळखीच्या व्यक्तींकडून ५८ घटना घडलेल्या असून उर्वरित २२ घटनांमध्ये गुन्हेगार व पीडिता यांची ओळख नसल्याचे समोर आले आहे. विवाहितांवरील अत्याचारांत सासरच्या व्यक्तींचा समावेश असल्याचे वेगवेगळ्या तक्रारींवरून पुढे आले आहे. पती - पत्नीमधील वादातून किंवा सासरच्या जाचाविरोधात महिला साहाय्यता कक्षाकडे वर्षभरात ६३३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १५१ दाम्पत्यांचा पोलिसांच्या मध्यस्थीनंतर काडीमोड टाळला आहे. मात्र, उर्वरित ४८२ दाम्पत्ये एकमेकांपासून विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. यापैकी बहुतांश तक्रारी ह्या पत्नीवर अविश्वास किंवा सासरच्यांकडून होत असलेल्या छळाबाबत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीतदेखील महिलांच्या मनात घुसमट असल्याने, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर अनेक महिला हा होणारा अत्याचार सहन करत संसाराशी तडजोड करीत असल्याचेही दिसून येत आहे. 

बालवयातला प्रेमभंगतारुण्यात पाय ठेवण्यापूर्वीच अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरातून मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले जात आहे. मागील वर्षभरात अशा ३१ मुलींची राज्याबाहेरून सुटका करण्यात आली आहे. अशा मुलींना श्रीमंतीची किंवा सुखी संसाराची भुरळ घातली जाते.  प्रत्यक्षात मात्र पळवून नेल्यानंतर सातत्याने तिला शारीरिक व मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. 

संसारात समजूतदारपणा नाही nपती - पत्नीमधील वादात अनेकदा पती किंवा सासरच्यांकडून काडीमोड करण्याचा निर्णय घेतला जातो. यामध्ये सर्वाधिक महिला भरडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा काडीमोड टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न पोलिसांकडून होत असतो. nमात्र गतवर्षी महिला साहाय्यता कक्षाकडे दाखल झालेल्या एकूण ६३३ तक्रारींपैकी ४८२ तक्रारदार विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे या प्रकरणांमधून  महिलांवर अन्यायच होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई