मुंबई : दोन चिमुरडय़ांसह महिलेने लोकलसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री भांडूुप स्थानकाजवळ घडली. यात पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्रीदेवी वडेर (30) या पती आणि ओमकार (5) व दर्शन (3) या दोन मुलांसह भांडुप येथील टेंभीपाडय़ात राहत होत्या. शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास त्या आपल्या पतीसह गप्पा मारत बसल्या होत्या. त्यानंतर पोटात दुखत असल्याचे सांगत श्रीदेवी यांचे पती झोपण्यासाठी गेले.
थोडय़ा वेळाने झोपेतून जाग आली असता घरात पत्नी आणि दोन मुले नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांची शोधाशोध केली असता ते सापडले नाहीत. त्यानंतर कुर्ला रेल्वे पोलिसांनी या तिघांपैकी दोघांचा लोकल अपघातात मृत्यू झाल्याची माहितीच त्यांना दिली तसेच एकावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले. याबाबत साहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अनगळ यांनी सांगितले की, भांडुप ते नाहूरदरम्यान शुक्रवारी मध्यरात्री पावणोएकच्या सुमारास धीम्या ट्रॅकवर हे तिघेही पडल्याचे प्रवाशांना दिसले आणि त्याची माहिती त्यांनी रेल्वे पोलीस तसेच स्थानकातील स्टेशन मास्तरला दिली. तात्काळ घटनास्थळी पोलीस रेल्वे कर्मचा:यांसह दाखल झाले असता हा प्रकार निदर्शानास आला. श्रीदेवी यांचे पती हे टेंभीपाडा येथील एका माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. या घटनेचा तपास सुरू असून, त्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. मात्र ही आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
च्रेल्वे पोलीस अपघातस्थळी पोहोचले असात तिघांपैकी पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे दिसले, तर तीन वर्षाचा दर्शन हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला टाके पडले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.