नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच अर्थसंकल्प सादर करण्याचा मान नवी मुंबई महापालिकेच्या सभापती नेत्रा शिर्के यांना मिळाला. वर्षभर पारदर्शक कारभारास प्राधान्य देणाऱ्या सभापतींनी अर्थसंकल्प वास्तवदर्शी व सर्वसमावेशक करण्याकडे लक्ष दिले आहे. महिलांसाठी कायदाविषयक मोफत सल्लाकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. शहरात प्रथमच सीएसआर (व्यावसायिक सामाजिक बांधिलकी) च्या माध्यमातून विकासकामे केली जाणार आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेचा २०१६ - १७ चा अर्थसंकल्प अनेक कारणांनी लक्षवेधी ठरला. आतापर्यंत स्थायी समिती सभापतीपदावर महिलांना संधी मिळाली नव्हती. हे पद महिला सांभाळू शकणार नाहीत असे बोलले जात होते. परंतु नेत्रा शिर्के यांनी वर्षभर यशस्वीपणे स्थायी समितीचा कारभार चालवून दाखविला. अर्थसंकल्प तयार करताना शहरातील सर्व १११ नगरसेवकांना पत्र पाठवून त्यांच्या प्रभागामध्ये कोणती कामे करणे आवश्यक आहे याविषयी लेखी माहिती मागविली. शहरामध्ये महिलांसाठी मोफत कायदेविषयक सल्लाकेंद्र नसल्याने ८ मार्चला पहिले मोफत सल्लाकेंद्र पालिका मुख्यालयामध्ये सुरू करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील अनेक प्रसिद्ध वकील स्वेच्छेने सहभागी होत आहेत. महिलांसाठी जास्तीत जास्त शौचालय उभारण्यासाठी सीएसआर ची मदत घेतली जाणार आहे. मनपाच्या स्थापनेपासून पहिल्यांदा उद्योजकांकडील निधी शहराच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. प्लास्टीकमुक्त शहर करण्यासाठी पालिका नियमित कारवाई करत असते. परंतु प्लास्टीकला पर्याय उपलब्ध करून दिला जात नाही. बचतगटांच्या माध्यमातून कापडी व कागदी पिशव्या बनविण्यास प्रोत्साहन देणे व या पिशव्याच वापरण्यासाठी व्यावसायिकांना प्रवृत्त करण्याची भूमिका मांडली आहे. पालिका शिक्षण मंडळासाठी प्रथमच १२२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिका शाळांमध्ये वार्षिक स्रेहसंमेलन करण्यासाठीही ६५ लाख रूपयांची तरतूद केली आहे. महापालिकेने ऐरोली, नेरूळ व बेलापूरमध्ये बांधलेली रूग्णालये खाजगी संस्थेला देण्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. परंतु सभापतींनी तीनही रूग्णालये महापालिकाच सुरू करणार असल्याचे स्पष्ट करून ही चर्चा थांबविली. प्रत्येक रूग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष तयार केला जाणार असून हा देशातील पहिला उपक्रम ठरणार आहे. चांगले उपचार मिळणे म्हणजे आरोग्य सुविधा नाही. नागरिक आजारी पडूच नये यासाठी काळजी घेणे आवश्यक असून यासाठी घनकचरा व्यवस्थापन व शहर स्वच्छतेवर पुढील वर्षभर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)> अर्थसंकल्पाची वैशिष्ट्येमहिलांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राची स्थापनाशिक्षणासाठी १२० कोटी रूपयांची तरतूदप्रथमच सीएसआर (व्यावसायिक सामाजिक बांधिलकी) निधीचा वापर पालिकेच्या रूग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष आयटी कंपन्यांविरोधात कडक भूमिका , सर्वेक्षण करण्यात येणारपरवाना शुल्क व जाहिरातीचे उत्पन्न २५ पट जास्त होणारमालमत्ता कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजनाप्रत्येक ८ मार्चला महिलांना एनएमएमटीमध्ये प्रवासास ५० टक्के सवलत
अर्थसंकल्पावर महिलांचा ठसा
By admin | Updated: March 8, 2016 02:08 IST