शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये स्त्रीशक्तीचा जागर

By admin | Updated: April 24, 2017 02:36 IST

सध्याचे युग इंटरनेटचे आहे. प्रत्येक जण कामात एवढा व्यस्त झाला आहे की जणू जगणे विसरून गेला आहे. संसाराचा गाडा हाकताना

पनवेल : सध्याचे युग इंटरनेटचे आहे. प्रत्येक जण कामात एवढा व्यस्त झाला आहे की जणू जगणे विसरून गेला आहे. संसाराचा गाडा हाकताना स्त्रियांना मोठी कसरत करावी लागते. नोकरी सांभाळून संसार करणे हे एक आव्हान आजच्या स्त्रियांसमोर असते. मात्र हा सर्व ताणतणाव विसरून खारघरमध्ये हजारो स्त्रियांनी एकत्र येऊन नुकताच जागर स्त्रीशक्तीचा हा कार्यक्रम यशस्वी केला. भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष लीना गरड यांनी या कार्यक्र माचे आयोजन केले होते. खारघरमधील गोखले हायस्कूल मैदानात हा कार्यक्र म पार पडला. कार्यक्र माला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हळदी-कुंकू, वन मिनिट गेम शो, आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी शुभांगी कांबळे यांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून दुचाकी जिंकली. धावपळीच्या जीवनात हजारो महिलांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर केल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. तर महिलांना निखळ आनंद देण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी गरड यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, अर्जुन गरड, भाजपा शहर उपाध्यक्ष अमर उपाध्याय, प्रीती मिलिंद ठोकळे, मोना अडवाणी, गीता चौधरी, कुंदा मेंगडे, राजेश पारखे, राजेश धवणे आदींसह हजारो महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)