शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतून महिला पोलीस बेपत्ता

By admin | Updated: August 6, 2015 00:34 IST

कामोठे पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी मंगळवार रात्रीपासून बेपत्ता झाली आहे. तिची स्कूटी वाशी खाडीपुलावर आढळली असून बॅगमध्ये चिठ्ठीही सापडली आहे.

नवी मुंबई : कामोठे पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी मंगळवार रात्रीपासून बेपत्ता झाली आहे. तिची स्कूटी वाशी खाडीपुलावर आढळली असून बॅगमध्ये चिठ्ठीही सापडली आहे. खाडीमध्ये शोध घेऊनही तिचा अद्याप शोध लागलेला नाही. कामोठे पोलीस ठाण्यात नेमणूक असलेली प्राची वाघ (२६) ही महिला कर्मचारी मंगळवार रात्री १०.४५ वा.पासून बेपत्ता झाली आहे. तिची स्कूटी वाशी खाडीपुलावर आढळली. वाशी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता स्कूटीवर लटकवलेल्या बॅगमध्ये प्राचीचे ओळखपत्र, मोबाइल व इतर वस्तू आढळल्या. तसेच पर्समधील ५०० रुपयांच्या नोटेवर लिहिलेली चिठ्ठी देखील पोलिसांच्या हाती लागली. यावरून तिने पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आला. वाशी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने खाडीत शोध घेतला. परंतु पहाटेपर्यंत शोध घेऊनही जिवंत अथवा तिचा मृतदेह हाती न लागल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. बुधवारी सकाळी पोलिसांनी पुन्हा खाडीत शोधमोहीम राबवली मात्र काहीही शोध लागला नाही.प्राचीचे एप्रिल महिन्यात लग्न झाले असून पती गणेश व सासू-सासऱ्यांसोबत ती घाटकोपरला राहते. कामावरून सुटल्यानंतर उशिरा घरी जाण्यावरून त्यांच्यात वाद व्हायचा. त्यावरून दोन दिवसांपूर्वीच सासरच्यांनी तिच्या आई-वडिलांना घरी बोलावून तिच्या वागण्याची तक्रार केलेली. या कौटुंबिक वादातून तिने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंगळवारी खारघर येथील बंदोबस्ताची ड्युटी चार वाजता संपल्यानंतरही ती घरी गेली नव्हती. अखेर रात्री ९.३० वाजता तिने पतीला फोन करून पावसामुळे नेरुळ पुलाखाली थांबली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रात्री १०.४५ वाजता तिची स्कुटी खाडीपुलावर आढळली. याप्रकरणी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर तिचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)