शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
2
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
3
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
4
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
5
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
6
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
7
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
8
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
9
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
10
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
11
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
12
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
13
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
14
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
15
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
16
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
17
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
18
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
19
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
20
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक

छत कोसळल्याने महिला जखमी

By admin | Updated: July 2, 2017 06:27 IST

चार दिवसांपासून जोरदार वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी रात्री ऐरोली सेक्टर-२ येथील एका घराच्या छताचे पत्रे कोसळल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : चार दिवसांपासून जोरदार वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी रात्री ऐरोली सेक्टर-२ येथील एका घराच्या छताचे पत्रे कोसळल्याने त्यात एक वृद्ध महिला जखमी झाली आहे. राधाबाई अशोक वाघमारे (७६), असे या वृद्धेचे नाव आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सेक्टर १५ मधील दक्षिणात्य गृहनिर्माण सोसायटीतील एका घराच्या छताचे प्लास्टर निखळल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जोरदार वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पावसाचा जोरदार फटका ऐरोली, दिघा परिसरातील रहिवाशांना बसला आहे. दिघ्यातील यादवनगर येथील मुख्य नाल्यात मोठ्या प्रमाणात डेब्रिज पडल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऐरोली सेक्टर-२मधील बी-४२0 मध्ये राधाबाई वाघमारे मागील काही वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहतात. नियमित डागडुजीअभावी घराची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी घराचे पत्रे बदलण्याच्या सूचना त्यांनी घरमालकाला केली होती; परंतु घरमालक गावी राहत असल्याने पावसाळ्याअगोदर हे काम होऊ शकले नाही. यातच शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोडकळीस आलेले घराचे पत्रे उडून खोलीत पहुडलेल्या राधाबार्इंच्या अंगावर पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. या घटनेचे वृत्त समजताच, स्थानिक नगरसेवक संजू वाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज आहे. त्यानुसार सदर कुटुंबाला आपत्कालीन मदत निश्चित केली जाईल, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.