शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

महिलांच्या स्वच्छतागृहात पुरुषांना दिली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:20 IST

पनवेल महापालिकेचा अजब कारभार : झवेरी बाजार परिसरात येणाऱ्या महिलांची कुचंबणा

पनवेल : शहरात झवेरी बाजारात पनवेल महापालिकेने उभारलेल्या महिलांच्या स्वच्छतागृहात सर्रास पुरुष मंडळींना परवानगी देण्याचा अजब कारभार पाहावयास मिळत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या झवेरी बाजारात हे स्वच्छतागृह आहे .पनवेलमधील झवेरी बाजार परिसरात नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी भाजी मार्केट, सराफा बाजार, कपडे, भांड्याची दुकाने असल्याने महिलावर्गाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबता असतो. शहराबरोबरच आजूबाजूच्या गावांतील नागरिकही या ठिकाणी खरेदीसाठी येतात. महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाच्या साफसफाईसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी पुरुषांनाही परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे.

स्वच्छतागृहात पाणी नसल्यानेही गैरसोय होत आहे. येथील कर्मचारी महिलांशी उद्धटपणे वागतात. पालिकेच्या माध्यमातून या प्रकारावर आळा घालण्याची मागणी केली जात आहे. स्वच्छतागृहात आजूबाजूच्या दुकानदारांनी सिलिंडरसह अन्य सामान ठेवले आहे. यासंदर्भात पालिकेचे स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता, संबंधित प्रकाराची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पोलीस निवारा केंद्रही रिकामेनवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत अनेक ठिकाणी पोलीस निवारा केंद्रे सुरू केली आहेत. शहरातील समस्या अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पोलिसांची मदत मिळेल, यादृष्टीने हे निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. झवेरी बाजार परिसरात स्वच्छतागृहालगतच पोलीस निवारा केंद्र आहे. मात्र, या ठिकाणी पोलीस क्वचितच असतात.

टॅग्स :Womenमहिला