शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

ब्रिटिशकालीन जलस्रोत उपयोगाविनाच

By admin | Updated: April 21, 2016 02:55 IST

निसर्गाच्या अद्भुत जादूई लीलेने माथेरान येथे जलाशयाचे साठे आजही अनेकदा डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतात

माथेरान : निसर्गाच्या अद्भुत जादूई लीलेने माथेरान येथे जलाशयाचे साठे आजही अनेकदा डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीपासून जवळपास २,६०० फुटांवर वसलेल्या माथेरानमधील अनेक भागांत असे नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्याचा प्रशासनाकडून सदुपयोग केला जात नसल्याने एप्रिल-मे या शेवटच्या व्यावसायिक हंगामात पाण्याच्या अत्यल्प पुरवठ्यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. येथील दस्तुरी नाका परिसरातील घनदाट जंगलात वनउद्यांना शेजारीच ब्रिटिशकालीन सिम्पसन टँक हा ४० फूट खोल असलेला तीन एकराच्या जागेतील तलाव बाराही महिने पाण्याने भरलेला असतो. परंतु या तलावाचे पाणी सहसा वापरात आणले जात नाही. इक्को पॉइंटजवळ वॉकर टँक या ब्रिटिशकालीन डबकेवजा तलावात झऱ्याच्या स्रोताचा मुबलक पाणीसाठा असतो. श्रीराम मंदिर या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणच्या पश्चिमेला जुनी बोअरवेल असून, यापूर्वी तिचा वापर होत असे. परंतु अनेक वर्षांपासून ही बोअरवेल बंद अवस्थेत आहे. सनसेट पॉइंटजवळ म्यालेट स्प्रिंग हा बाराही महिने जिवंत झरा आयुर्वेदिक पाण्याचा आहे. तर संत रोहिदास नगरच्या पूर्वेस चांभार पाणी या ठिकाणी बाराही महिने झऱ्याचे पाणी वाहत असते. तसेच बाजारातील कमेला येथेही झऱ्याचे पाणी वाहते. त्याचप्रमाणे गळती या कॉटल शेड ठिकाणी पेमास्टर विहीर अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. माथेरानमधील हे सर्वच जलस्रोत नगर परिषद प्रशासनाने उपयोगात आणल्यास पाण्याची कमतरता भासणार नाही, असे येथील नागरिकांचे मत आहे. सध्या माथेरानमध्ये पाणीटंचाई असल्यामुळे हे नैसर्गिक स्रोत उपयोगात आणावे, अशी माथेरानकरांची मागणी असून हे स्रोत उपयोगात आले तर सर्वांनाच दिलासा मिळून पर्यटन व्यवसाय आपोआपच बहरेल, अशी अपेक्षा व्यक्त के ली जात आहे.(वार्ताहर)