शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मदतीशिवाय आपत्तीग्रस्तांचे जगणे कठीण

By admin | Updated: May 10, 2017 00:25 IST

पनवेल येथील इंदिरानगर झोपडपट्टीला आग लागली त्याला चार दिवस झाले तरी शासकीय मदत मिळाली नव्हती. आगीत नुकसान झालेली

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल येथील इंदिरानगर झोपडपट्टीला आग लागली त्याला चार दिवस झाले तरी शासकीय मदत मिळाली नव्हती. आगीत नुकसान झालेली सात कुटुंबे शेजाऱ्यांकडे रहात होती. त्यावेळी अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी मदत केली नसती तर आमचे जगणे कठीण झाले असते, अशी प्रतिक्रिया आगीत घरे भस्मसात झालेल्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.पनवेलमधील प्रभाग १७ मधील संतोष कीर्तीकर, अनंता पवार, अब्दुल्ला आलम, गणेश शिंदे रा. शिवाजी नगर, तानाजी शिंदे, सूर्यकांत बावस्कर रा. नवनाथ नगर व सुनील गुंजाळ, आझाद नगर यांनी ८ मे रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी आपल्या आठवणी जाग्या केल्या. ७ फेब्रुवारी रोजी इंदिरा नगर झोपडपट्टीला आग लागली त्यावेळी आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या. नैसर्गिक आपत्ती नसल्याने त्यांना शासकीय मदत मिळाली नव्हती. अनेक जण येऊन फोटो काढून मदतीचे आश्वासन देऊन जात होते. मात्र प्रत्यक्षात कोणीही मदत केली नाही. यावेळी पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ व सुशीला घरत यांनीच पहिली आर्थिक मदत केल्याचे आपत्तीग्रस्तांनी सांगितले.