शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांतच ढासळू लागले रेलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 02:30 IST

कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी उपस्थित केली शंका

नवी मुंबई : रस्त्यांलगत रेलिंग बसवण्याच्या कामात झालेल्या हलगर्जीमुळे ते ढासळू लागले आहेत. अशाच प्रकारातून गुरुवारी घणसोलीत रस्त्यालगतचे पूर्ण रेलिंग ढासळले. सुदैवाने त्यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही. मात्र निकृष्ट कामांमुळे रेलिंग पडत असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.पालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक नोडमधील रस्त्यांलगत रेलिंग बसवण्यात आले आहेत. मात्र ठेकेदारांमार्फत ही कामे केली जात असताना त्यात निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे रेलिंग बसवल्याच्या काही दिवसातच ते वाकल्याचे किंवा त्याखालील भाग खचल्याचे दिसून येत होते. अशाच प्रकारे घणसोली सेक्टर ७ येथे देखील संपूर्ण रेलिंग रस्त्याकडील बाजूला झुकले होते. परंतु लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकाऱ्यांकडून त्याकडे डोळेझाक होत होती. परिणामी गुरुवारी रात्री ते रेलिंग रस्त्यावर कोसळले. त्याच ठिकाणी नागरिकांना पदपथावर बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. यानुसार त्याठिकाणी सकाळ-संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक व लहान मुले बसलेली असतात. त्यामुळे जर हे रेलिंग पदपथावर कोसळले असते, तर जीवितहानीचीही शक्यता निर्माण झाली असती. यामुळे पादचाºयांसह रहदारीला देखील अडथळा निर्माण होत आहे.अशाच प्रकारे शहरातील इतरही अनेक ठिकाणचे रेलिंग कोसळण्याच्या स्थितीत आहेत. यानंतरही लोकप्रतिनिधींकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने सहा महिन्यांपूर्वी सर्वच नोडमध्ये केलेल्या रेलिंगच्या कामात लोकप्रतिनिधींचाहीअर्थपूर्ण हितसंबंध असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.