शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिकेच्या सभेत वादळी चर्चा

By admin | Updated: March 23, 2016 02:25 IST

पनवेल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सभागृहात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधक काही विषयांवरून आमनेसामने आले.

पनवेल : पनवेल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सभागृहात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधक काही विषयांवरून आमनेसामने आले. मात्र विविध विकासकामांना सुध्दा यावेळी मंजुरी देण्यात आली.नगराध्यक्षा चारुशीला घरत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपनगराध्यक्ष मदन कोळी, बांधकाम सभापती राजू सोनी, महिला व बालकल्याण सभापती सीता पाटील, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, विरोधी पक्षनेते संदीप पाटील, मुख्याधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी, चारुशीला पंडित नगरसेवक उपस्थित होते. सुरुवातीलाच इतिवृत्त वाचन सुरू असताना सभागृहात गदारोळ झाला. मागील सभेत पाच विषयांबाबत जी काही चर्चा झाली होती, त्याबाबत इतिवृत्तात उल्लेख न करता सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार निर्णय घेतले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी केला. त्याचबरोबर पनवेल शहरातील काही समस्यांबाबतही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा झाली. याव्यतिरिक्त पनवेल शहरातील काही रस्त्यांचे सिमेंटीकरण कृष्णाळे तलावाकरिता संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रि या झालेल्या पाण्याचा वापर करण्याकरिता यंत्रणा विकसित करण्याकरिता जो खर्च येईल, त्या कामालाही सभेने मंजुरी दिली. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान प्रस्तावित केलेल्या कामांना सुध्दा हिरवा कंदील देण्यात आला. पनवेल शहरात महानगर गॅस लिमिटेड यांना शहरातील काही भागांत गॅस वाहिन्या टाकण्यास पालिकेने मंजुरी दिली. पालिकेच्या शाळांची रंगरंगोटी, त्याचबरोबर डागडुजी करण्याचा निर्णय सभेत सर्वानुमते घेण्यात आला. प्राथमिक कन्याशाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकाम आराखड्यास सुध्दा मान्य करण्यात आला. पालिका क्षेत्रात अल्पसंख्याकबहुल विभागातील विविध विकासकामांना प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात आली. याशिवाय विविध ५० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा करण्यात आली, त्याचबरोबर निर्णय घेण्यात आला. सत्ताधारी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमानिमित्त जी बैठक बोलाविण्यात आली होती, त्यावेळी फक्त १० नगरसेवक उपस्थित होते, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अशोक भुजबळ यांच्याऐवजी नगरसेवक सुभाष भुजबळ यांचे नाव शिपाई म्हणून छापण्यात आल्याने गोंधळ झाला. पालिकेच्या वतीने सुमारे १० लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधी जमा करण्याची सूचना विरोधकांनी केली. (प्रतिनिधी)