शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘देहरजी’ भागविणार नवीन पालघरची तहान; सिडकोचा एमएमआरडीएबरोबर करार

By कमलाकर कांबळे | Updated: December 7, 2022 05:32 IST

तांत्रिक कारणांमुळे रखडलेली कामेही आता पूर्ण झाली आहे.  त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच  पालघर नवीन शहर प्रकल्प उभारणीच्या दिशेने  सिडकोने कंबर कसली आहे.

कमलाकर कांबळेनवी मुंबई : नवीन पालघर शहराच्या विकासासाठी सिडकोने कंंबर कसली आहे. त्यानुसार नियोजित नवीन पालघर शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या नवीन शहरासाठी सिडकोने पाण्याचेही नियोजन केले आहे.  विक्रमगड तालुक्यातील देहरजी धरणाचे ५० एमएलडी पाणी नवीन पालघरला वळविण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. एमएमआरडीएबरोबर अलीकडेच त्या संबंधीचा करार केल्याची माहिती सिडकोच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. 

शहर निर्मितीत सिडकोचा हातखंडा आहे. नवी मुंबई हे याचे उत्तम उदाहरण आहे. सिडकोचा हा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने  पालघर जिल्ह्यात नवीन शहर उभारण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे. पालघर आणि बोईसर शहराच्या मध्यभागी ३३० हेक्टर क्षेत्रफळाच्या जागेवर हे अद्यावत नवीन शहर साकारले जात आहे.  विशेष म्हणजे, पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षकांचे कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत, नवीन प्रशासकीय इमारत, प्रेक्षागृह, शासकीय विश्रामगृह तसेच जिल्हा मुख्यालयातील किमान दहा टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान आदींच्या उभारणीची जबाबदारीही सिडकोवर सोपविली होती. त्यानुसार आतापर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीची उभारणी केली आहे. 

तांत्रिक कारणांमुळे रखडलेली कामेही आता पूर्ण झाली आहे.  त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच  पालघर नवीन शहर प्रकल्प उभारणीच्या दिशेने  सिडकोने कंबर कसली आहे. प्रस्तावित नवीन शहराचा विकास नियोजनबद्ध व सर्वसमावेशकरित्या व्हावा, यादृष्टीने आदर्श मॉडेल तयार केले आहे. त्यानुसार नवीन शहराचा विकास आराखडा तयार केला जात आहे. हे कामसुद्धा अंतिम टप्प्यात  आहे. 

१,४४४ कोटींचा धरणावर खर्च  देहरजी धरणासाठी नव्याने १,४४३ कोटी ७२ लाख रुपयांची सुधारित मान्यता एमएमआरडीएने दिली आहे. या धरणातून सिडकोनिर्मित नवीन पालघर शहरासाठी ५० एमएलडी, पालघर जिल्हा परिषदेस ३२ गावांच्या पाणी योजनेसाठी १० एमएलडी आणि एमएमआरडीए क्षेत्रासाठी १९५ एमएलडी पाणी राखीव ठेवले आहे. कोकण पाटबंधारे महामंडळ हे धरण बांधत आहे.

पाण्याचे नियोजन सुरू

एमएमआरडीएच्या माध्यमातून विक्रमगड तालुक्यात २५५ एमएलडी क्षमतेचे देहरजी धरण बांधले जात आहे. या धरणात एमएमआरडीए क्षेत्रातील लोकवस्तीसाठी या धरणात पाणीसाठा राखीव केला जाणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुळातच पाण्याची समस्या आहे. अशा परिस्थितीत नवीन पालघर प्रकल्पाची तहान कशी भागवणार, असा सवाल केला जात होता. त्यादृष्टीने सिडकोने आतापासून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार  या धरणातील ५० एमएलडी पाणीसाठा राखीव  करण्यासाठी अलीकडेच एमएमआरडीए बरोबरच करार केला आहे.

टॅग्स :cidcoसिडको