शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील बेवारस वाहनांचा मालक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 02:47 IST

पालिकेची कारवाई थंडावली : वाहतुकीला होतो मोठा अडथळा

वैभव गायकरपनवेल : शहरात मागील वर्षभरापासून कोरोनामुळे बेवारस वाहनांवर पालिकेची कारवाईत थंडावली आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे शहर विद्रुप होत चालले आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांकडून या  वाहनांची तक्रार वाहतूक पोलिसांकडे केली जाते. मात्र, वाहतूक पोलीस संबंधित जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगतात. कोरोनापूर्वी पालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारे बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम अतिशय वेगवान केली होती. २४ तासांपेक्षा जास्त काळ रस्त्यावर थांबलेल्या वाहनांना पालिकेमार्फत नोटीस दिली जात होती. तरीही वाहने न हटविल्यास पालिकेकडून संबंधितांना दंड आकारला जात होता. मात्र, पुन्हा एकदा बेवारस वाहनांचा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. कोरोनापूर्वी पालिकेने १९७ वाहने जप्त केली होती. यामध्ये ९९ दुचाकी, १४ तीनचाकी व ८४ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. कोरोनामुळे पालिकेची बेवारस वाहनांविरोधात कारवाईची मोहीम थंडावली आहे. 

अशा वाहनांमुळे अस्वच्छता बहुतांश चौकात अशा प्रकारची बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होतेच. त्याव्यतिरिक्त या गाड्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असते. ही वाहने धुळीने भरलेली असतात. तसेच या गाड्यांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो. 

पालिकेकडून मध्यंतरी बेवारस वाहनांवर स्टिकर लावून कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, पुढे त्या वाहनांवर कोणतीच कारवाई झाली नाही. कारवाई केली जात नसल्याने सर्वत्र रस्त्याच्या कडेला बेवारस वाहनांच्या संख्येत मोठी भर पडली आहे.- बिना गोगरी,रहिवासी, खारघर सेक्टर १९

कोरोना काळात बेवारस वाहनांवर कारवाई थांबली होती. तत्पूर्वी पालिकेमार्फत १९७ विविध प्रकारची बेवारस वाहने जप्त करण्यात आली? आहेत. सोमवारपासून नव्याने बेवारस वाहनांविरोधात कारवाईची मोहीम पालिका क्षेत्रात राबविणार आहोत. - सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका 

अनेक वेळा ही वाहने कोणाची आहेत ? ती मोकळ्या जागेवर कशी आली? याविषयी रहिवाशांना काहीच माहीत नसते.  याबाबत पालिकेने कारवाईची गरज आहे. - मनेश माने, रहिवासी, पनवेल

अनेक महिने ही वाहने एकाच जागेवर असतात. पालिकेकडे यासंदर्भात तक्रार केली असता, कारवाई केल्यावर त्या वाहनांचे मालक आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना काय उत्तर देणार ? असे उत्तर  पालिकेचे काही कर्मचारी देतात. - रामचंद्र देवरे, रहिवासी, खारघर सेक्टर ८

बेवारस वाहने पालिकेने जप्त करून त्यांच्यावर कारवाईची गरज आहे. बहुतांश वेळेला अनेक गाडी मालक आपली वाहने रस्त्यावर टाकून जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असतो. संबंधित वाहनांना कोण वालीच नसेल तर पालिकेने त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. - आनंद चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर वाहतूक शाखा

 

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबईcarकार