शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्याचे उद्घाटन कधी?

By admin | Updated: July 7, 2015 02:19 IST

एनआरआय पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु मुख्यमंत्र्यांची तारीख न मिळाल्यामुळे उद्घाटन रखडले आहे. जुन्या गळक्या इमारतीमधून पोलीस स्टेशनचे कामकाज करावे लागत

नामदेव मोरे  नवी मुंबईएनआरआय पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु मुख्यमंत्र्यांची तारीख न मिळाल्यामुळे उद्घाटन रखडले आहे. जुन्या गळक्या इमारतीमधून पोलीस स्टेशनचे कामकाज करावे लागत असून येथे लॉकअप नसल्यामुळे नुकतेच एका महिला आरोपीने पलायन केल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दिवाळे ते उरणपर्यंत विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. खाडीकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोरा व एनआरआय ही दोन सागरी पोलीस स्टेशन तयार केली आहेत. एनआरआय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेलापूर गाव, सीवूड ते उलवेपर्यंतचा परिसर येतो. बेलापूर गावात १९३० साली सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या जुन्या कौलारू इमारतीमधून पोलीस स्टेशनचे कामकाज सुरू आहे. पावसाळ्यात इमारतीचे छत गळते. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. तक्रार घेवून एकाच वेळी ५ पेक्षा जास्त नागरिक आल्यास त्यांना बाहेरील मोकळ्या जागेत उभे रहावे लागत आहे. प्रसाधनगृह पुरेसे नाही. पाणीपुरवठाही व्यवस्थित होत नाही. लॉकअपरूमच नाही. येथील आरोपींना नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये न्यावे लागते. २६ जूनला उलवे परिसरातील रियाज शेख यांच्या घरात चोरी झाली. चोरट्यांनी २ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी एक महिलेला संशयित म्हणून अटक केली. परंतु महिला पोलीस स्टेशनमधून पळून गेली. पळून गेल्याप्रकरणीही तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोने महापालिका मुख्यालयासमोर एनआरआय पोलीस स्टेशनसाठी विस्तृत भूखंड दिला आहे. त्या ठिकाणी सुसज्ज पोलीस स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. स्वागत कक्ष, कर्मचारी विश्रांती गृह, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना स्वतंत्र दालन, लॉकअप व इतर सर्व सुविधा आहेत. इमारतीमधील फर्निचरचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसल्यामुळे नवीन इमारतीला टाळे लावून ठेवण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ते न आल्यास तितक्याच मोठ्या मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यालय उपआयुक्त विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता मुख्यमंत्र्यांच्या तारखेमुळे उद्घाटन रखडले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.