शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेच्या हरकतींंवर सुनावणी कधी?

By admin | Updated: July 8, 2016 03:29 IST

पनवेल महापालिका स्थापनेसंदर्भात शासनामार्फत अधिसूचना काढून पालिका हद्दीतील रहिवाशांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या. ही प्रक्रिया घाईघाईत पार पाडल्याचा आरोप काहींनी केला.

पनवेल : पनवेल महापालिका स्थापनेसंदर्भात शासनामार्फत अधिसूचना काढून पालिका हद्दीतील रहिवाशांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या. ही प्रक्रिया घाईघाईत पार पाडल्याचा आरोप काहींनी केला. असे असले तरी पालिका हद्दीतून जवळजवळ चार हजारांपर्यंत हरकती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या. या सर्व प्रक्रियेला महिनाभराचा कालावधी पूर्ण होत आलेला असताना या हरकती, सूचनांवर होणाऱ्या सुनावणीची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे. पनवेल नगरपरिषद हद्दीतील शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित (नैना) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकत्रित करुन त्यात पाच लाख ९५ हजार लोकसंख्या गृहीत धरलेली आहे. पनवेल नगरपरिषदेची प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली. यामध्ये दहा प्रभाग नव्याने स्थापन करण्यात आले. डिसेंबर महिन्यात पनवेल नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडतील अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. हरकती व सूचनांवर जून महिन्याच्या शेवटी सुनावणी होईल अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र या प्रक्रियेला विलंब होत असल्याने पनवेल महानगरपालिकेची प्रक्रिया मंदावली असून नगरपरिषदेच्या निवडणुका सर्वप्रथम पार पडतील अशी चर्चा सुरू आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामधील महानगरपलिका प्रशासन याबाबत विचारणा केली असता यासंदर्भात कोकण आयुक्त लवकरच सुनावणी घेतील असे सांगण्यात आले. मात्र यासंदर्भात नेमकी तारीख निश्चित झाली नसल्याचे सांगण्यात आले. महानगर पालिका स्थापन होत असताना खारघरमधील काही संघटना, राजकीय पक्ष यांनी नियोजित पनवेल महानगर पालिकेत समाविष्ट होण्यास प्रखर विरोध दर्शविला होता. त्यामुळे खारघर शहर महानगरपालिकेतून वगळण्यात येईल अशाप्रकारच्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र यासंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर जनसुनावणी झाल्यावरच अंतिम निर्णय होईल. येत्या १५ तारखेपर्यंत यासंदर्भात जनसुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (प्रतिनिधी)