शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विद्युत, इंधननिर्मिती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 02:59 IST

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या नेटकनेक्ट फाऊंडेशन या संस्थेने यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी अलिकडेच चर्चा केली. हैद्राबाद येथील बोईपल्ली शहराच्या धर्तीवर वाया जाणाऱ्या भाज्यांवर प्रक्रिया करून विद्युत निर्मित्ती करण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे मांडला.

नवी मुंबई : नवी मुंबईत गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन व विद्युत निर्मित्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सुमारे दीडशे मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. हा बायोगॅस पालिकेची वाहने आणि एनएमएमटीच्या बसेससाठी वापरला जाणार आहे. तसेच टाकाऊ भाज्यांपासून विद्युत निर्मित्ती तयार करण्याची तयारीही महापालिकेने दर्शविली आहे.पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या नेटकनेक्ट फाऊंडेशन या संस्थेने यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी अलिकडेच चर्चा केली. हैद्राबाद येथील बोईपल्ली शहराच्या धर्तीवर वाया जाणाऱ्या भाज्यांवर प्रक्रिया करून विद्युत निर्मित्ती करण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे मांडला. त्या चर्चेनुसार बांगर यांनी टाकाऊ भाजीपाल्यापासून विद्युत निर्मित्ती करण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बी. एन. कुमार यांनी स्पष्ट केले आहे. नवी मुंबईत दिवसाला साधारण ७०० मेट्रीक टन कचरा गोळा होतो. यात एपीएमसीतील फळ आणि भाजी मार्केटमध्ये सर्वाधिक ओला कचरा गोळा होतो. त्याशिवाय शहरातील हॉटेल्समधूनसुध्दा मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होतो. एकूण निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे वर्गीकरण केल्यास जवळपास दीड मेट्रीक टन ओला कचरा तयार होतो. या ओल्या कचऱ्यापासून इंधन निर्मित्ती करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यानुसार लवकरच शहरात दोन सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या दोन्ही परिमंडलांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे दोन बायोगॅस प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.हैद्राबाद येथील बोईपल्ली या शहरात दिवसाला १० टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून ५०० मेगा युनिट विद्युत तर ३० किलो बायोगॅसची निर्मित्ती केली जाते. नवी मुंबईत असा प्रयोग केल्यास नक्कीच त्याचा फायदा होईल. शिवाय पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होणार आहे.- बी. एन. कुमार, संचालक, नेटकनेक्ट फाऊंडेशन

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका