शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत; सीवूड, सानपाड्यासह वाशीमध्ये शोभायात्रा

By नामदेव मोरे | Updated: March 22, 2023 18:20 IST

ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेमध्ये नवी मुंबईमध्ये जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

नवी मुंबई : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेमध्ये नवी मुंबईमध्ये जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सीवूड, सानपाडा, वाशीसह विविध भागात शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. वाहन, इलेक्ट्रिक साहित्य खरेदीलाही नागरिकांनी पसंती दिली होती. दागिने खरेदीसाठी ज्वेलर्सच्या दुकानांमध्येही गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.  ठाणे व डोंबिवलीप्रमाणे नवी मुंबईलाही सांस्कृतिक नगरी अशी ओळख प्राप्त होऊ लागली आहे. गुढीपाडव्याला विभागनिहाय शोभायात्रांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. सीवूडमध्ये सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, गृहनिर्माण सोसायट्या एकत्र येऊन शोभायात्रा काढून एकतेचे दर्शन घडवतात.बुधवारी जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशामधील महिलांनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. ढोल-ताशांच्या गजरात सीवूडचा राजा चौकापासून ते सेक्टर ४८ मधील विठ्ठल रूक्माई मंदिरापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. यावर्षी कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्थेला शोभायात्रेच्या नियोजनाचा मान मिळाला होता.

 वाशीतील स्वामीनारायण गुरुकुल सेक्टर २९ येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या माध्यमातून गुढीपाडव्यानिमित्त भव्य नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशात नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते गुढीची पूजा करून शोभायात्रेचा शुभारंभ झाला. माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नववर्ष स्वागतयात्रा समितीचे कार्याध्यक्ष कृष्णा पंडित, उत्सव प्रमुख सागर मटकर,माजी नगरसेवक शशिकांत राऊत, प्रकाश मोरे, प्रभाकर भोईर, शिल्पा मोरे, सुनंदा राऊत व इतर मान्यवर सहभागी झाले होते. सानपाडामध्ये अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून शोभायात्रेचे आयोजन केले होते.

वाहन खरेदीला पसंती

गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी मोटारसायकल व कार खरेदीला पसंती दिली होती. शोरुममध्ये विधिवत पूजा करून नवीन वाहने घरी नेली जात होती. नवीन वाहनांना ॲसेसरीच बसविताना शोरुममधील कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती.

दागिने खरेदीलाही पसंती

सोन्याचे दर वाढले तरी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी दागिने खरेदीला पसंती दिली. लग्न समारंभासाठी मुहूर्तावर दागिने खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिले होते.