शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ढोलताशांच्या गजरात स्वागत

By admin | Updated: April 9, 2016 02:29 IST

मराठी नववर्षाचा प्रथम दिन म्हणजेच गुढीपाडवा. यानिमित्त शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते

नवी मुंबई : मराठी नववर्षाचा प्रथम दिन म्हणजेच गुढीपाडवा. यानिमित्त शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, ढोलताशा पथकांची प्रात्यक्षिके, महिलांच्या बाईक रॅली तसेच पारंपरिक पध्दतीने गुढी उभारून मंगलमय वातावरणात गुढीपाडवा साजरा करण्यात आला.बेलापूर, सीवूड्स, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली या सर्वच विभागांमध्ये शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले. सीबीडी- बेलापूर येथे आयोजित शोभायात्रेत महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी शोभायात्रेच्या माध्यमातून जल हैं तो, कल हैं हा मोलाचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सीबीडी सेक्टर ८ कालीमाता मंदिर येथून निघालेल्या या शोभायात्रेचा शेवट सेक्टर २ येथील अलबेला हनुमान मंदिर येथे झाला. या शोभायात्रेला आमदार मंदा म्हात्रे, नगरसेविका सरोज पाटील, रोहिदास पाटील, सुलेखनकार अच्युत पालव यांची विशेष उपस्थिती होती. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी घणसोली येथील आधार ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. घणसोली सेक्टर ५ येथून सुरू झालेल्या या शोभायात्रेची सांगता वाशीतील शिवाजी चौकात करण्यात आली. त्यामध्ये परिसरातील नागरिकांनी तसेच मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. इंग्रजी नववर्षाचे स्वागत तरुणांकडून मद्यप्राशन करून साजरे होत असल्याने देशाची भावी पिढी भरकटत चालली आहे. यामुळे तरुणांना आपल्या संस्कृतीची जाणीव करून देत तिचे जतन करण्याच्या उद्देशाने शोभायात्रेचे आयोजन केले जात असल्याचे आयोजक राजू गावडे यांनी सांगितले.कोपरखैरणेतील रणादेवी मित्र मंडळाच्या वतीने प्रथमच शोभायात्रा काढण्यात आली. स्थानिक नगरसेवक शिवराम पाटील व नगरसेविका अनिता पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक व तरुण यांच्यासह महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. सेक्टर २० येथून या शोभायात्रेची सुरुवात करून तलावालगत त्याची सांगता करण्यात आली. (प्रतिनिधी)